हंगा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

हंगा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान

 हंगा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान

मुश्रीफ यांची आ. नीलेश लंके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

नगरी दवंडी/प्रतिनिधी

पारनेर ः पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आ. नीलेश लंके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी हंगा ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवड झालेल्या नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला पालकमंत्र्यांचे आमदार लंके यांच्या मातोश्री सौ शकुंतला लंके व वडील ज्ञानदेव लंके यांनी त्यांचे स्वागत केले आमदार लंके यांचे साधे घर पाहून त्यांच्या साध्याराहणीमानाचे व साधेपणाचे कौतुक केले पालकमंत्र्यांनी आमदार लंके यांची साधी राहणी साधे घर मात्र त्या घरातील कुटुंबातील सलोख्या व प्रेमळपणा याचे त्यांना अप्रूप वाटले लंके यांच्या संघटन कौशल्या बाबत चर्चा आहे मात्र प्रत्यक्षात त्याचाही अनुभव त्यांना येथे आल्यानंतर आला आमदार लंके यांच्या घरी मंत्री मुश्रीफ यांनी अल्पोआहार घेतला यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निकालाची माहिती घेतली ग्रामपंचायत संमिश्र निकाल लागलेल्या ग्रामपंचायती तसेच पूर्ण राष्ट्रवादीच्या ताब्यात कोणत्या ग्रामपंचायती आल्या याची इत्यंभूत माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार लंके यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक केले हंगा गावातील झालेल्या विविध विकास कामांची माहिती चंद्रकांत मोढवे यांनी पालकमंत्र्यांना दिली हंगा ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार थेट ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते झाल्याने नूतन सदस्यांचा आनंद द्विगुणित झाला होता यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दळवी वनिता शिंदे नीता रासकर जगदीश साठे सविता नगरे रूपाली दळवी राजेंद्र शिंदे सुलोचना लोंढे बाळासाहेब दळवी माया साळवे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके दिपक लंके चंद्रकांत मोडवे धोंडीभाऊ नगरे बाळासाहेब शिंदे अशोक दळवी संदीप शिंदे सुहास नगरे भाऊ रासकर तुकाराम नवले सतीश दळवी नंदू सोडकर प्रमोद दळवी रामदास साठे कु.अक्षदा लंके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment