कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा राज्यव्यापी महामेळावा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा राज्यव्यापी महामेळावा.

 कुस्ती-मल्लविद्या महासंघाचा राज्यव्यापी महामेळावा.


कोल्हापूर -
महाराष्ट्र राज्य कुस्ती-मल्लविद्या महासंघ सर्व पदाधिकारी यांचा राज्यव्यापी महामेळावा रविवार दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी दुपारी 11 वाजता श्रीदत्त समर्थ सांस्कृतिक हॉल कोल्हापूर-पन्हाळगड रोड कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमात महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातील दिग्गज अवलीयांची उपस्थिती लाभणार आहे.
   छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर महामेळाव्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून अर्जुनवीर पैलवान काकासाहेब पवार मेळाव्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष अर्जुनवीर पैलवान राहुल आवारे (पोलीस उप अधीक्षक) असून सन्माननीय पाहुणे म्हणून महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीप (नाना) भरने, महाराष्ट्र चॅम्पियन धनाजी पाटील आटकेकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, कुस्ती सम्राट असलम काझी =हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ (आबा), सेना केसरी पैलवान गुंडाजी पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रविंद्र पाटील, वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे, पैलवान वैभव (दादा) लांडगे =पैलवान पृथ्वीराज संभाजीराव पवार, ऑलम्पिक वीर बंडा पाटील रेटरेकर, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील आसगावकर, महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव मोळे, वस्ताद विश्वास दादा हारुगले, राष्ट्रीय कुस्ती कोच आनंदराव धुमाळ, समाजसेवक दीपक पाटील= पैलवान रणजीत खाशाबा जाधव यासह अनेक नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहेत. कुस्ती-मल्लविद्या महासंघातर्फे वर्षभर कुस्तीसाठी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. संस्थेमार्फत आजवर आणि तिच्यावर पैलवानांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. कुस्ती-मल्लविद्या फेसबुक फेसबुक कुस्ती-मल्लविद्या युट्युब चॅनेल द्वारे दररोज होणार्‍या कुस्त्यांची व्हिडिओ बातम्या प्रदर्शित करून सुशिक्षित समाजापर्यंत कुस्ती पोहोचवण्याचे काम केले जाते. अनेक कुस्ती मैदानाचे थेट प्रक्षेपण करून कुस्तीला तब्बल 52 देशात प्रसिद्ध केले जाते. सदर मेळाव्यात महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या 365 तालुक्यातील पदाधिकारी यांचा महामेळावा होऊन यामध्ये संस्थेच्या पुढील वाटचालीबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे. निमंत्रक, पैलवान गणेश मानुगडे, संस्थापक कुस्ती-मल्लविद्या महासंघ यांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here