राजेश्वरी कोठावळे युवतीचे संघटन उभे करतील : ना. मुश्रीफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

राजेश्वरी कोठावळे युवतीचे संघटन उभे करतील : ना. मुश्रीफ

 राजेश्वरी कोठावळे युवतीचे संघटन उभे करतील : ना. मुश्रीफ

 युवती अध्यक्षा कोठावळेंचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

नगरी दवंडी/प्रिंतनिधी

पारनेर ः पारनेर तालुक्यातील सांगवी सूर्या येथील कु. राजेश्वरी कोठावळे यांची नुकतीच अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड   प्रदेशाध्यक्ष सक्षणा’ताई सलगर यांनी जाहीर केली.  
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी नवनियुक्त  राष्ट्रवादीच्या अहमदनगर युवती अध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांचा सन्मान केला.
   यावेळी मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब बोलताना म्हणाले की,  युवतींच्या संघटन कामाच्या माध्यमातून राजेश्वरी कोठावळे यांनी राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत. यावेळी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे कोठावळे यांचे नामदार मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.
   दरम्यान राजेश्वरी कोठावळे या पारनेर तालुक्यातील सांगवी  सूर्या येथील असून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी काम केलेले आहे तसेच ते अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी असतात  राष्ट्रवादीचे अध्यक्ष व देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात  करत असलेली सामाजिक कामे तसेच  त्यांच्यात  असलेल्या संघटन कौशल्यामुळे व राष्ट्रवादीच्या नेत्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा’ताई सलगर यांच्यासोबत असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि त्यांच्या या सामाजिक राजकीय कामाची दखल घेऊन  राष्ट्रवादी पक्षाच्या अहमदनगर युवती  अध्यक्षपदी राजेश्वरी कोठावळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
   कोठावळे यांचा सत्कार प्रसंगी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, आमदार निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, तहसीलदार ज्योती देवरे, अशोक सावंत, संभाजीराव रोहोकले, अशोक घुले, संभाजीराव रोहोकले, बबलूशेठ रोहोकले, विक्रम कळमकर डॉ. राजेश भनगडे, सरपंच लीलाताई रोहोकले, संदीप ठुबे, रा. या. औटी, विजयकुमार कुलथे, राजेंद्र चौधरी, सखाराम औटी, गंगाराम रोहोकले, किसन रासकर,अभयसिंह नांगरे, पुनम मुंगसे, बाळासाहेब पुंडे, सोमनाथ वरखडे, कविता औटी, परशुराम फंड आदी. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment