न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मास्क वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मास्क वाटप

 न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मास्क वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

पारनेर ः प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या विद्यालयात 1992 अखंड मैत्री ग्रुप आणि रमीजभैय्या राजे यांच्याकडून मास्क वाटप करण्यात आले.
   यावेळी निवृत्त पोलिस निरीक्षक श्री इंद्रभान सरोदे हे 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षिका सौ.मगर मॅडम यांनी शासन आदेशानुसार हरित वसुंधरा शपथेचे वाचन करून सर्व उपस्थितांनी शपथ घेतली. राष्ट्रीय छात्र सेनेचे श्री संतोष पारधी सर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र यांनी संचलन केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री मुकुंद जासूद सर, उपप्राचार्य श्री करंजुले सर, पर्यवेक्षक श्री वाव्हळ सर,निवृत्त शिक्षिका सौ.लताताई पोटे, माजी विदयार्थीनी सौ.मनीषा जगदाळे,श्री रमीजभैय्या राजे,नौदल सैनिक गणेश बेल्हेकर,1992 अखंड मैत्री ग्रुप च्या सौ.जयश्री घावटे ठुबे, डॉ.संदीप औटी,श्री विनायक कानडे,रामदास औटी,ह.भ.प.भाऊसाहेब क्षीरसागर महाराज, रमेश भोसले आणि संतोष लोहकरे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here