दीनदयाळ पतसंस्थेचे अर्थ व सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : बेरड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, January 28, 2021

दीनदयाळ पतसंस्थेचे अर्थ व सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : बेरड

 दीनदयाळ पतसंस्थेचे अर्थ व सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद : बेरड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगरमध्ये सहकारी संस्था सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्याचे चांगले काम करत आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे नाव संपूर्ण राज्यात नावाजलेले आहे. पंडित दीनदयाळ पतसंस्था आर्थिक क्षेत्रातिल भरीव योगदाना बरोबरच सामाजिक दृष्टीकोन ठेवत  विविध उपक्रम राबवत असल्याने दीनदयाळ पतसंस्थेचे अर्थ व सामाजिक क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष भानुदास बेरड यांनी केले.
   भारताच्या 72 व्या प्रजासत्तक दिनानिमित्त पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात भानुदास बेरड यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी चेअरमन वसंत लोढा, व्यवस्थापक निलेश लाटे, सहव्यवस्थापक सुखदेव दरंदले व कर्मचारी उपस्थित होते. वसंत लोढा म्हणाले, अयोध्यामध्ये प्रभुरामाच्या मंदिराचे काम प्रत्यक्ष सुरु झाल्याने सर्व भारतीयांची स्वप्नपूर्ती झाली आहे. या मंदिराच्या उभारणीच्या कार्यात पंडित दीनदयाळ पतसंस्था व दीनदयाळ परिवार तन मन धनाने सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here