राष्ट्रीय मतदार दिन नागापूर येथे उत्साहात साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

राष्ट्रीय मतदार दिन नागापूर येथे उत्साहात साजरा

 राष्ट्रीय मतदार दिन नागापूर येथे उत्साहात साजरा  


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

नेवासा फाटा ः नेवासा तालुक्यातील नागापूर येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी नागपूरचे लोकनियुक्त सरपंच अ‍ॅड.संदीप कापसे हे होते.
यावेळी सरपंच संदीप कापसे यांच्या हस्ते मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली व मतदारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.  
   याप्रसंगी मतदान नोंदणी अधिकारी महेश देवतरसे यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ उपस्थितांना दिली. सरपंच संदीप कापसे यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट करतांना लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत मांडले.  
   कार्यक्रमासाठी अ‍ॅड.संदीप कापसे, नागापूरचे ग्रामसेवक भिसे भाऊसाहेब, मेजर नामदेव कापसे, सोपान कापसे, राजू आरगडे, ग्रामपंचायत कर्मचारी विकी जावळे, राजू घोरपडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नागापूर शाळेच्या शिक्षिका श्रीमती सोनाली भुसारी (अकोलकर) यांनी मानले.

No comments:

Post a Comment