नेवासा फाटा येथील अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 30, 2021

नेवासा फाटा येथील अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू

 नेवासा फाटा येथील अपघातात एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः
नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकाजवळ  झालेल्या अपघातात  उस्थळ दुमाला येथील युवक  प्रतीक शिवाजी बदलले ( वय  24)याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
   याबाबत प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार  चहा पिण्यासाठी एक आयशर ट्रक  विठ्ठल वस्त्र दालनासमोरील  बाजूस थांबलेला होता  सदर युवक हा नेवासा फाटा येथील  विठ्ठल वस्त्र दालना समोरून  गाडी रस्त्याकडे वळवत असताना  पाठीमागून आलेल्या वॅगन आर  कारचालकाचा वेग  नियंत्रणात न आल्याने  सदर युवकाचा गाडीला जोराची धडक बसली . आणि त्यात युवकाचा जागीच मृत्यू झाला.
   शवविच्छेदनासाठी मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात  नेण्यात आला .सदर युवकावर रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेवासा फाटा आणि उस्थळ दुमाला येथील  मोठा मित्रपरिवार आणि नातेवाईक उपस्थित होते .प्रतीक याच्या अकाली अपघाती निधनाने  परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

No comments:

Post a Comment