केंद्राने शेतकर्‍यांच्या आंदोलनावर हटवादी भूमिका घेणे थांबवावे ः पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 30, 2021

केंद्राने शेतकर्‍यांच्या आंदोलनावर हटवादी भूमिका घेणे थांबवावे ः पवार

 केंद्राने शेतकर्‍यांच्या आंदोलनावर हटवादी भूमिका घेणे थांबवावे ः पवार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन प्रश्न हटवादी भूमिका घेणे थांबवली पाहिजे . ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या यांना या वयात शेतकर्‍यांसाठी उपोषणाची वेळ यावी हे केंद्र सरकारच्या नाकर्तेपणा असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहुरीत केला.
   नगर जिल्ह्याच्या महत्त्वकांक्षी अशा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या भूमिपूजनचे शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते राहुरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते . उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की शेतकर्‍यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर रेलीतील हिसेच्या प्रकारामागे आंदोलनाला बदनाम करण्यासाठी कोणीतरी नक्कीच आहे ? शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकारने केलेले आहे . माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साखर निर्यात , कांदाप्रश्न , कर्जमाफी , याप्रश्नी शेतकरी त्याची नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे . राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांच्या बाजूने भक्कम आहे . राज्यात 44 लाख कृषी पंपाचे सुमारे 45 हजार 706 कोटी रुपयांची थकबाकी आहे . शासनाने यात सकारात्मक निर्णय घेतला असून दंड व विलंब आकार बाजूला काढून उर्वरित थकबाकीतील काही रक्कम शेतकर्‍यांनी भरायची आहे . जमा झालेली रक्कम त्यात जिल्ह्यात खर्च करण्यात येईल .
   नगर जिल्ह्यात तीन लाख 97 हजार शेतीपंपांची सुमारे पाच हजार कोटी रुपये थकबाकी आहे. शेतकर्‍यांनी सौरऊर्जेवर आधारित उपकरणांत प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप ,आशुतोष काळे, लहू कानडे, ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, सुरेशराव वाबळे, निर्मलाताई मालपाणी, राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here