अवतार मेहेरबाबाचा अमरतिथी उत्सव होणार नाही, तीन दिवस दर्शन पण बंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

अवतार मेहेरबाबाचा अमरतिथी उत्सव होणार नाही, तीन दिवस दर्शन पण बंद

 अवतार मेहेरबाबाचा अमरतिथी उत्सव होणार नाही, तीन दिवस दर्शन पण बंद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः येथील अरणगाव रोडवरील मेहेराबाद येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी होणारा 52 वी अमरतिथी (पुण्यतिथी)सोहळा दि 30जाने.ते 1 फेबु 21 पर्यंत दरवर्षीप्रमाणे  यावर्षीचा  अमरतिथी सोहळा कोविडच्या पार्श्वभूमीवर होणार नसून दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत समाधी दर्शनासाठी बंद राहणार आहे अशी माहिती अवतार मेहेरबाबा ट्रस्टने पत्रकाद्वारे दिली आहे
याबाबत अधिक माहिती देताना डॉ.मेहेरनाथ कलचुरी म्हणाले म्हणाले अमरतिथीला भारतातून जगातून तसेच राज्यातून हजारो मेहेरप्रेमी अमर तिथीला येत असतात पण कोविडमुळे यावर्षी अमरतिथी  उत्सव साजरा करण्यात येणार नाही. या तीन दिवसात होणारे कार्यक्रम   हे सर्व  रेकॉर्डिंग द्वारे ऑनलाइन पद्धतीने वर्च्युअल दृक्श्राव्य पद्धतीने  होणार आहे त्याची लिंक पुढीलप्रमाणे र्रींरींरीाशहशीलरलर्रीीीीींं.ेीस तर्ळीीींरश्र -ारीींळींहळ आहे यानुसार सर्व मेहर प्रेमींना अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या वतीने विनंती करण्यात येते की कोणीही मेहेराबाद आरणगाव येथे दिनांक 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 20 21 रोजी येऊ नये व सरकारी नियमांचे संपूर्ण पालन करून अमर तिथी  उत्सव आपापल्या निवास्थानी साजरा करावा अवतार मेहेरबाबा यांचे नामस्मरण करावे
मेहेरबाद  येथे संस्थेकडून कुठल्या प्रकारची निवासाची,खाण्या-पिण्याची व्यवस्था, दर्शन आधी सुविधा करण्यात येणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी,दि 31 जानेवारी रोजी दुपारी 12  ते 12.15 पर्यंत अवतार मेहेरबाबा यांच्या मौन कालावधीत प्रत्येक मेहर प्रेमींनी आपल्या निवासस्थानातून मौन धरावे,तीन दिवस  येथे कुठल्याही प्रकारचे भजन,आरती,गायन,वादन,नृत्य इत्यादी कुठलाही कार्यक्रम संपन्न होणार नाही याची नोंद घ्यावी व सर्व भाविकांनी संस्थेचे संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टच्या वतीने  चेअरमन श्रीधर केळकर,विश्वस्त मेहरनाथ कलचुरी,रमेश जंगले,जाल दस्तूर त्यांच्यासह सर्व विश्वस्तांनी केले आहे.

No comments:

Post a Comment