रुद्र अपंग संघटनेकडून ऑनलाईन सर्टिफिकेट सुविधा सुरु करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

रुद्र अपंग संघटनेकडून ऑनलाईन सर्टिफिकेट सुविधा सुरु करण्याची मागणी

 रुद्र अपंग संघटनेकडून ऑनलाईन सर्टिफिकेट सुविधा सुरु करण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या आजारामुळे गेले 10 महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयातील दिव्यांगांसाठी असणारी ऑनलाईन सर्टिफिकेट सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. आता बर्‍याचप्रमाणात सर्व व्यवहार सोशल डिस्टिन्सींग व मास्कचा वापर करून सुरू झालेले आहेत. म्हणून रुद्र अपंग संघटनेच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे बंद असलेले ऑनलाईन सर्टिफिकेट सुविधा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दिव्यांगांकडे अपंगत्वाचे सर्टिफिकेट नसल्याकारणाने त्यांना कोणतीही शासकीय सुविधेचा लाभ घेता येत नाही. तसेच जिल्हाभरातून अपंगांना जिल्हा शासकीय रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे दिव्यांगांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होती. त्यामुळे शासनाने दिव्यांगांसाठी ऑनलाईन सर्टिफिकेट सुविधा तालुका स्तरावर सुरू कराव्या, जेणेकरुन जिल्हा रुग्णालयात होणारी गर्दी कमी होईल. यामुळे दिव्यागांना होणारी शारीरिक व मानसिक त्रास होणार नाही. यासाठी लवकरात लवकर दिव्यांगांसाठी ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी रुद्र अपंग संघटनेच्यावतीने हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, जिल्हाध्यक्षा आशाताई गायकवाड, जिल्हा सचिव बापू पांडुळे, जिल्हा उपाध्यक्ष महेश विभुते, नगर तालुकाध्यक्ष रामेश्वर तुपे आदींनी केली.
घुले साखर कारखान्याच्या संचालकपदी मच्छिंद्र म्हस्के
नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका ः नेवासे तालुक्यातील लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील सहकारी साखरकारखाना भेंडा ता.नेवासा संचालकपदी शिवसेना तालुकाअध्यक्ष  मच्छींद्र सुर्यभान म्हस्के यांची तर, मुळा सहकारी साखरकारखाना सोनई ता.नेवासा संचालकपदी लक्ष्मण तुळशीराम पांढरे यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्यातील माका तसेच महालक्ष्मी हिवरे गावातील ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब मचे,मुळा कारखान्याचे माजी संचालक एकनाथ जगताप,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवान गंगावणे, शिवसेनेचे तालुकानेते घनश्याम लोंढें,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन कामराज पालवे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here