पायी जाणाऱ्या वृध्दास मोटारसायकलची धडक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

पायी जाणाऱ्या वृध्दास मोटारसायकलची धडक

 पायी जाणाऱ्या वृध्दास मोटारसायकलची धडक 

वृध्दाचा मुत्यू, मोटारसायकल स्वाराविरुध्द गुन्हा दाखल 


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  प्रतिनिधी बीड रोडवरील हापटवाडी जवळ रस्त्याने पायी जाणाऱ्या वृध्दास मोटारसायकल ने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटारसायकलस्वारा विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
   पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की मयत वृध्द बापू दगडु वाघमारे, वय. ७०, वर्षे, रा. मोहा. ता. जामखेड हे सहा दिवसांपुर्वी म्हणजे दि २२ जानेवारी रोजी रात्री पावणे आठ वाजता जामखेड येथुन आपल्या मोहा गावी रस्त्याच्या कडेने पायी चालले होते. याच दरम्यान मोटारसायकल क्रमांक एम एच २३ बी बी ६५३६ वरुन जाणाऱ्या आरोपी दत्तात्रय पांडुरंग येवले रा. यवलवाडी. ता. पाटोदा. जिल्हा. बीड याने या वृध्दास मोहा जवळील हापटवाडी येथील लक्ष्मी थेटर जवळ पाठीमागून येऊन जोराने धडक दिली. त्यामुळे या अपघातात वृध्दाचा मुत्यू झाला.
    या नंतर आज दिनांक २८ रोजी मयताचा मुलगा सुनील बापु वाघमारे, रा. मोहा यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील मोटारसायकल चालकाविरुद्ध मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करुन पाठीमागून धडक दिली व मयताच्या मृत्यूस कारणीभूत व स्वतः च्या दुखापतीस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. के. बी. कोळपे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment