आरोग्यदायी तीळापासूनच्या पाककृती स्पर्धेत श्रध्दा मुदीगंटी प्रथम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 13, 2021

आरोग्यदायी तीळापासूनच्या पाककृती स्पर्धेत श्रध्दा मुदीगंटी प्रथम

 आरोग्यदायी तीळापासूनच्या पाककृती स्पर्धेत श्रध्दा मुदीगंटी प्रथम


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः आरोग्याच्या दृष्टीने तीळाचे सेवन खूप महत्त्वाचे असते. तीळाचा आहारात वापर वाढावा यासाठी डॉ.प्रसाद उबाळे आयुर्वेदालय व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊनच्यावतीने खास पाक कला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 52 स्पर्धकांनी सहभाग घेवून तीळापासून विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते सादर केले. स्पर्धेचे उद्घाटन डॉ.प्रसाद उबाळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष क्षितीज झावरे उपस्थित होते. परीक्षक शेफ संदीप कडभने,डॉ. हेमा सेलोत, अभिनेत्री मधुरा झावरे यांनी सर्व पदार्थांचे परीक्षण केले. त्यावेळी त्यांनी सर्व स्पर्धकांच्या नाविन्यपूर्ण कल्पकतेचे कौतुक केले.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक श्रद्धा मुदिगंटी, द्वितीय पारितोषिक ज्योती बोरा (तीळ दही वडा),तृतीय पारितोषिक कल्याणी छिंदम(तीळ लच्छा पराठा), उत्तेजनार्थ पारितोषिक: मोहिनी मुकुंद मुळे(तीळ कचोरी), शांता मोरे(तीळ मोदक आमटी) यांना मिळाले.
यावेळी बोलताना डॉ.प्रसाद उबाळे यांनी तिळाचे औषधी महत्त्व सांगून दैनंदिन आहारात तीळ का असावेत याविषयी माहिती दिली. रोटरी मिडटाउनचे क्षितिज झावरे यांनी आभार प्रदर्शन केले तसेच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा पुढील काळात आयोजित करण्याचा मानस बोलून दाखवला.या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेचे संपुर्ण परीक्षण फेसबुक लाईव्ह व्दारे सर्व स्पर्धक तसेच नागरिकांनी पाहिले. बक्षीस वितरण दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी अहमदनगर क्लब येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment