टीव्ही मालिकांंमधील प्रसिध्द नाव साक्षी तन्वर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 13, 2021

टीव्ही मालिकांंमधील प्रसिध्द नाव साक्षी तन्वर

 टीव्ही मालिकांंमधील प्रसिध्द नाव साक्षी तन्वर


साक्षी तन्वर भारतीय टिव्हिचा असा नाव बनला या नावाला सगळ्या देशात एक ओळख प्राप्त झाली आहे. बालाजी टेलीफिल्मसच्या छत्राखाली तयार झालेल्या मालिकांमध्ये अत्यंत प्रभावी अभिनय केल्यामुळे नेहमीच टिव्हि रसिकांची मने साक्षीने जिंकली आणि कहानी घर घर की या मालिकेमुळे तर साक्षीची पार्वती ही खरच प्रत्येक घरात घरात पोहचली.कहानी घरघर की ही मालीका एवढी प्रसीद्ध झाली होती की देशभरातून मालीकेला भरपूर पसंती मिळाली आणि यामुळेच साक्षी तन्वर ही प्रसिद्धी शिखरावर पोहचली.पार्वती म्हणजेच साक्षीचा जन्म 12 जानेवारी 1973 रोजी राजस्थान येथील अलवर जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. साक्षीचे वडील राजेंद्र सिंह तन्वर एक निवृत्त सीबीआय अधिकारी वडीलांच्या नोकरीमुळे नेहमी बदल्या होत होत्या आणि त्यामुळे साक्षीला विविध ठिकाणी जावे लागले आणि म्हणून विविध ठिकाणच्या केंद्रीय विद्यालयांमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षणानंतर दिल्ली येथील श्रीराम महिला कॉलेजमध्ये साक्षीने ग्रॅज्युएशन पूर्ण केले.आपल्या महाविद्यालयीन काळात साक्षी ड्रामा सोसायटीची अध्यक्षही राहिली.आपल्या वयक्तिक जीवनात साक्षी ही अत्यंत मृदु स्वभावाची असून अभिनयाचे विविध कौशल्य अंगीकृत केलेले असल्याने तिला प्रत्येक भुमिकेत चाहत्यांची पसंती मिळत आली आहे.साक्षीचे महाविद्यालयीन शिक्षणानंतर मास कम्युनिकेशनची तयारी करत असताना तिने दुरदर्शनवर प्रसारीत होणारी अलबेला सुर मेला साठी ऑडीशन दिले.या ऑडीशनमध्ये सिलेक्ट झाल्यानंतर तिच्या टिव्हि करीअरची सुरवात झाली.साक्षीने यानंतर पुन्हा मागे वळून कधी पाहिलेच नाही.दस्तुर या मालिकेत प्रमुख भुमिका केल्यानंतर साक्षीला विविध डेली सोपच्या ऑफर येण्यास सुरवात झाली आणि साक्षीने एहसास,एक्सजोन,ंभंवर इत्यादी मालिकांमध्ये काम केले यानंतरच साक्षीला राजधानी नावाच्या मालीकेत भुमिका मिळाली आणि लोकामध्ये तिला ओळख मिळण्यास त्यावेळी सुरवात झाली परंतु साक्षी तन्वरच्या यशोशिखरावरील सर्वात मोठा वळण म्हणजेच तिच्या करिअरचा टर्निंगपाँईंट जो होता तो म्हणजे एकता कपुरच्या बालाजी बॅनर्स मध्ये तयार होणारी मालीका कहानी घर घर की मध्ये साक्षीला संधी मिळाली आणि संपूर्ण भारतातील रसिकांच्या मनात या मालिकेने आणि  पार्वती म्हणजेच साक्षी तनवरने अधिराज्य केले.2008 पासून साक्षी टिव्हि मालिकांबरोबरच चित्रपटांमध्येही दिसली आणि कॉफी शॉप,सी कंपनी,मोहल्ला अस्सी अशा विविध चित्रपटांमध्ये भुमिका केल्या आणि 2016 साली आलेल्या आमिर खानच्या सुपरहिट चित्रपटात साक्षीनेही काम केले आणि तिच्या कुस्तीपटु मुलींच्या आईची भुमिका चाहत्यांनी खुप पसंत केली.साक्षीला 2003 मध्ये कहानी घर घर की साठी बेस्ट एक्ट्रेस इन लीड रोल पुरस्कार मिळाला.2006,2007 आणि 2008 मध्ये स्टार परिवार अवार्ड तर्फे फेवरेट भाभी पुरस्कार मिळाला.असे अनेक पुरस्कार तिच्या नावावर आहेत आणि यात बडे अच्छे लगते है या मालीकेसाठीही बेस्ट एक्ट्रेस अवॉर्ड तिला मिळाला.कहानी घर घर की नंतर साक्षीची सर्वात जास्त प्रसिद्ध झालेली मालीका म्हणजेच बडे अच्छे लगते है या मालीकेला आणि यातील भुमिका करणार्या साक्षी तन्वर आणि राम कपुरला चाहत्यांचा भरपुर प्रेम मिळाला आणि काही ऑफ स्क्रीन अफवाही या जोडीबद्दल त्याकाळी झाल्या की दोघही लग्न करणार वगैरे परंतू साक्षीने या सर्व अफवांना धुडकावत आम्ही आमच्या भुमिका अत्यंत जीव लावून करतो आणि त्यानंतर बाकी काही नाही असे स्पष्टीकरण देत साक्षीने या चर्चांना पुर्णविराम लावले आणि आतापर्यंतही साक्षीने लग्न केलेल नाही.सध्या साक्षीची एक वेबसिरीज कर ले तु भी मोहब्बत खुप गाजत आहे आणि याची एक विशेषता म्हणजे यातही साक्षी आणि राम कपुर सोबत आहेत.आज 12 जानेवारी साक्षी तन्वरच्या वाढदिवसानिमित्त आणि पुढील कारकिर्दीसाठी खुप शुभेच्छा !!

No comments:

Post a Comment