पिढी घडविण्यात थोर व्यक्तीमत्वाचे विचार मोलाचे ः बाळासाहेब बोराटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 13, 2021

पिढी घडविण्यात थोर व्यक्तीमत्वाचे विचार मोलाचे ः बाळासाहेब बोराटे

 पिढी घडविण्यात थोर व्यक्तीमत्वाचे विचार मोलाचे ः बाळासाहेब बोराटे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांनी समाजाला जागृत करुन राष्ट्र निर्माण कार्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकर्तुत्व आजही आपणासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार विद्यार्थी, युवकांमध्ये रुजविले गेले पाहिजे. एक आदर्श पिढी घडण्यासाठी राष्ट्र पुरुषांचे विचार मोलाची भुमिका बजावत असतात. श्री सावताश्रम शिक्षण संस्थेच्यावतीने या थोर महापुरुषांच्या कार्याचा आठवण भावी पिढीला देण्याचे कार्य केले जात आहे, असे प्रतिपादन श्री सावताश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.
श्री सावता श्रम शिक्षण संस्थेच्यावतीने महात्मा फुले विद्या मंदिर व सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मुख्याध्यापक राजकुमार शिंदे, मुख्याध्यापिका सुनिता पालवे, हर्षल म्हस्के आदिंसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक राजकुमार शिंदे यांनी राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात मोठी भुमिका बजावली आहे. अशा थोर व्यक्तीमत्वाच्या मार्गादर्शनाने अवघा महाराष्ट्र उभा राहिला.

No comments:

Post a Comment