दैठणे गुंजाळच्या सरपंचपदी बंटी गुंजाळ यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

दैठणे गुंजाळच्या सरपंचपदी बंटी गुंजाळ यांची निवड

 दैठणे गुंजाळच्या सरपंचपदी बंटी गुंजाळ यांची निवड


नगर:
नुकतेच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण घोषित करण्यात आले. 9 सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या दैठणे गुंजाळ गावामध्ये अनेक वर्षांनंतर सत्तांतर झाले आणि बंटी गुंजाळ उर्फ पांडुरंग सहादु गुंजाळ यांच्या पॅनलने सहा जागा मिळवित दणदणीत विजय मिळविला होता. यावेळी सरपंचपदासाठीचे आरक्षण निवडणुकीनंतर निघणार होते त्यामुळे दैठणे गुंजाळचे सरपंच कोण होणार याची उत्सुकता तालुक्याला लागली होती. नुकतेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर इतर मागास प्रवर्गासाठी असल्याचे जाहीर झाल्यानंतर पॅनलचे प्रमुख बंटी गुंजाळ उर्फ पांडुरंग सहादु गुंजाळ यांच्या नावावर सर्व सदस्यांनी एकमत दर्शविले आहे. त्यामुळे दैठणेच्या सरपंचपदासाठी बंटी गुंजाळ यांची निवड केली आहे. लवकरच निवडीची प्रशासकीय प्रक्रीया पुर्ण होईल. बंटी उर्फ पांडुरंग सहादु गुंजाळ हे यापुर्वीही दैठणेचे सरपंच राहिलेले आहेत. मितभाषी, मनमिळावु आणि लोकांच्या समस्या सोडविण्याची जाण असलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे लोकांनी त्यांच्या पॅनलला बहुमत दिले होते. खंडोबाचे देवस्थान आणि नाना पाटेकर यांच्या नाम फाऊडेशनचं भरीव काम यामुळे दैठणेची ओळख जिल्हाभरात आहे.  आता सरपंचपदाच्या माध्यमातुन बंटी गुंजाळ हे अजुन गावासाठी भरीव कामे करतील असा विश्वास येथील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निवडीचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, अरूणकाका जगताप, नगर- पारनेरचे आमदार निलेश लंके त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध स्तरातील लोकांकडुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment