तालुक्यातील 58 ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

तालुक्यातील 58 ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर

 तालुक्यातील 58 ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत जाहीर


जामखेड - 
जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींसाठी आज सरपंचपदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले. रोटेशन पध्दतीने ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आरक्षणाच्या कार्यक्रमावेळी विविध गावांचे गावकारभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण सोडती दरम्यान तहसिलदार विशाल नाईकवाडे, नायब तहसिलदार नवनाथ लांडगे व गटविकास अधिकारी परशुराम कोकणी यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रशासनाने जामखेड तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचे जाहिर केलेले आरक्षण खालील प्रमाणे-
         तालुक्यातील अनुसूचित जातीसाठी महिला आरक्षीत ग्रामपंचायत रत्नापुर, धनेगाव, हळगाव तर अनुसूचित व्यक्ती जवळा व कवडगाव तर अनुसूचित जमातीसाठी गुरेवाडी ग्रामपंचायत मध्ये व्यक्तीसाठी आरक्षित पडले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी महिला आरक्षण - आघी, खुरदैठन, चोंडी, तरडगाव, नायगाव, बाळगव्हाण, मोहरी, मुंजेवाडी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षण - आपटी, जवळके, धानोरा, मोहा, पाटोदा, पिंपळगाव उंडा, बांधखडक, राजेवाडी.
सर्वसाधारण खुला प्रवर्ग महीलांसाठी आरक्षण - आंनवाडी खर्डा खांडवी जातेगाव जायभाय वाडी डोणगाव तेलंगशी दिघोळ धामनगाव धोंडपारगाव नाहुली पिंपळगाव आळवा, फक्राबाद बोर्ले राजुरी शिऊर साकत व सातेफळ
सर्वसाधारण खुला प्रवर्ग व्यक्तीसाठी आरक्षण - अरणगाव, कुसडगाव, घोडेगाव, चोभेवाडी, झिक्री, देवदैठन, नान्नज, पाडळी, पिंपरखेड, पोतेवाडी, बावी मतेवाडी लोणी वाघा सावरगाव सोनेगाव वाकी व सारोळा


No comments:

Post a Comment