‘व्यसन’ आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्याही घातक ः डॉ.गोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

‘व्यसन’ आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्याही घातक ः डॉ.गोरे

 ‘व्यसन’ आरोग्य आणि आर्थिकदृष्ट्याही घातक ः डॉ.गोरे

दंतरोग तपासणी, व्याख्यान : सकल नाभिक समाजाच्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणारे दर सेकंदाला एक मृत्यू असे प्रमाण आपल्या देशात असून, या व्यसनाधिन्यांचे आयुष्य 24 वर्षांनी कमी होते. कर्करोगसारखे आजाराने त्रस्त लोकांत तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन करणारे बहुसंख्य आहेत. देशात अलिकडे एका पाहणीत 30 हजार कोटी रुपये या रुग्णांचे खर्च झाल्याचा अहवाल प्राप्त आहे. तंबाखूतील निकोटीन द्रव्य हे अत्यंत घातक असे आहे तर त्यातील डोकायत द्रव्य व्यसनाधिनांवर अनिष्ट परिणाम करणारे असल्याने हृदयरोग, उच्च रक्तदाब या सारख्या विकाराने अनेक त्रस्त आहेत. व्यसनाधिनांकडे समाजाचा पाहण्याच्या दृष्टीकोन नकारात्मक असून, व्यसनावर मोठा आर्थिक खर्च होतो ते वेगळे नुकसान आपण करतोय. यासर्व बाबींचा विचार करुन तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसनापासून दूर राहून आपले आणि आपल्या परिवाराचे जीवन सुरक्षित केले पाहिजे, असे आवाहन प्रख्यात दंतरोगतज्ञ डॉ.सुदर्शन गोरे यांनी केले.
येथील डॉ.गोरे डेन्टल हॉस्पिटल आणि सकल नाभिक समाज अ.नगर आयोजित व ओबीसी व सलून शहराध्यक्ष आणि नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दंत रोग तपासणी शिबीर आणि व्यसनमुक्ताता मार्गदर्शन कार्यक्रम पानसरे गल्लीतील संत सेना महाराज मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आला, यावेळी डॉ.गोरे बोलत होते. ते पुढे बोलतांना डॉ.गोरे म्हणाले, संत सेना महाराज आणि संत सावता महाराज यांच्यासह संत महंतांनी आपल्या कृतीतून मानवसेवेची शिकवण दिली आहे. या दोन संतांनी आपल्या व्यवसाय, बोलीतून रचलेले अभंग लोकप्रिय आहे. या शिकवणुकीचे पालन करण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे दंत रोग तपासणी शिबीर आहे. यामुळे समाजात आरोग्याचा जागर करीत असे अनेक आरोग्याचे प्रश्न आणि त्यावरील उपचार करणारे उपक्रम यापुढे व्हावे, हा संदेश यामुळे देता येईल. सर्व सामान्यांपासून लोकांची आरोग्य तपासणी करण्याच्या प्रयत्नाचा प्रारंभ रक्तदान शिबीर, दंत रोग तपासणी शिबीर आयोजित करुन एक चांगला वेगळा पायंडा श्री. गायकवाड आणि श्री.निकम यांच्या जन्मदिन कार्यक्रमाने सुरु केला आहे तो आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आवाहन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले. अनिल निकम यांचा यावेळी सत्कार करुन अनेकांनी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देतांना श्री.निकम म्हणाले, समाजकारणात काम करतांना मिळणारा आनंद आणि सेवाभावी वृत्ती जोपासनाची दिक्षा मिळाल्याने त्याचे पालन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहे, आपल्या शुभेच्छा आणि पाठबळ, असे कायम असावे.
ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चाचे नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे, जालिंदर बोरुडे, बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, खान्देश युवा मंचचे अध्यक्ष रामदास आहेर, मठ-मंदिर समितीचे हरिभाऊ डोळसे, नाभिक जिल्हा कार्याध्यक्ष विशाल सैंदाणे, शहराध्यक्ष श्रीपाद वाघमारे, साई संघर्ष प्रतिष्ठानचे योगेश पिंपळे, जीवन सोन्नीस, अनिल बापू औटी आदिंची समयोचित भाषणे झाली.
याप्रसंगी  श्री.भुजबळ यांचा ओबीसी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबीरात 40  रुग्णांची तपासणी करण्यात आली. सर्वश्री रमेश बिडवे, अशोक औटी, नंदकुमार सोन्नीस, बाबूराव दळवी, अनिल इवळे, बाबूराव ताकपेरे, श्रीरंग गायकवाड, सर्वेदा डिक्कर, शाम औटी, सुनिल आहेर, राजेंद्र सोन्नीस, कैलास गांगुर्डे, शरद आहेर, युवराज राऊत, संतोष जाधव, ललित आहिरे, सचिन खंडागळे, सौरभ सैंदाणे, प्रविण वाघमारे, ज्ञानेश्वर निकम, संदिप वाघमारे आदि उपस्थित होते. शेवटी अनिल निकम यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment