तपोवन रोड सुरु न झाल्यास अधिकार्‍यांना काळे फासणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 23, 2021

तपोवन रोड सुरु न झाल्यास अधिकार्‍यांना काळे फासणार

 तपोवन रोड सुरु न झाल्यास अधिकार्‍यांना काळे फासणार

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ.सुधीर टोकेकर यांचा इशारा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सन 2018 ग्रामसडक योजना अंतर्गत तपोवन रोड मंजुर झाला. त्यानंतर काही रोड झाला तर काही रोड झालेला नाही. अनेक चर्चा, वेगवेगळ्या पक्षाने केलेले आंदोलन, माहिती अधिकार वापरुन माहिती घेऊन या संदर्भात वर्तमान पत्रात बातम्या आल्या. सतत हा रस्ता चर्चेत राहिला मात्र महाल ते औरंगाबाद रोड पर्यंतचा रोड आहे. तसाच खराब आहे. महालापासून ढवण वस्तीपर्यंत तर खडीच खडी आहे. धुराळा आहे. गाड्या चालविता येत नाही. गाड्या नादुरुस्त व पंक्चर होत आहेत.  मात्र तरी पण या भागातील नागरिक शांत आहेत, मात्र आता हा उद्रेक झाला आहे. हा रोड एक महिन्यात न झाल्यास त्यानंतर कधीही संबंधित अधिकार्यांना काळे फासल्याशिवाय गंत्यतर नाही. शासन रोड मंजुर करते, पैसा देते मात्र ही यंत्रणा हे काम करत नाही, ही तर लोकशाहीची थट्टा आहे. तेव्हा एक तर काळे फासण्यास भाग पाडू नका, नाही तर तुमच्या रेल्वे स्टेशन जवळील कार्यालयासमोर उपोषणाला बसतील असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसेक्रेटरी कॉ.सुधीर टोकेकर, विडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष कॉ.भारती न्यालपेल्ली, अशितोष टोकेकर, नरेंद्र पासकंटी यांनी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे इशारा दिला आहे.
मी दोन वेळेस माहिती अधिकारात माहिती मागितली मात्र त्यांचाही उपयेाग होत नाही. नुकतीच एक महिन्यापूर्वी आरटीआय खाली अर्ज केला त्यास उत्तर दिले ‘रोडसाठी तीन महिने वाढवून मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.’ म्हणजेच मे महिन्यांपर्यंतही रोड होत नाही व नंतर पावसाळा म्हणजेच आम्हा नागरिकांवर अन्यायच आहे. आमदार संग्राम जगताप यांनाही नागरिकांनी फोनवर या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. शिवसेना व वकिल कारभारी गवळी यांनीही आंदोलने केली. मात्र या ग्रामसडक खात्याला जाग येत नाही. मुख्य व उपअभियंते यांना नागरिकांचा त्रास माहिती नाही, मी स्वत: या ठिकाणी राहतो. कंबरेचे पार खोबरे झाले आहे, अनेक वेळा गाड्या पंक्चर झाले आहेत. छोटे-मोठे अपघात झाले आहेत. तरी एक महिन्यात हा रस्ता व्हावा, अशी अपेक्षा आहे.  या संदर्भात खा.सुजय विखे यांनाही याची प्रत देऊन, मुख्यमंत्री यांनाही शिष्टमंडळ भेटणार आहे.

No comments:

Post a Comment