चिंतामणी प्रेरणा पर्वात शशिकांत खिस्तींशी संवाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 23, 2021

चिंतामणी प्रेरणा पर्वात शशिकांत खिस्तींशी संवाद

 चिंतामणी प्रेरणा पर्वात शशिकांत खिस्तींशी संवाद


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जगणं समृद्ध करणारा अनुभव... या अभुतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या ‘चितामणी आर्ट गॅलरी’, एमआयडीसीच्या ‘प्रेरणा’च्या दुसर्या पर्वाअंतर्गत सातवी मुलाखत संपन्न होत आहे. लॉकडाऊनच्या नंतर पुन्हा प्रारंभ होत असलेल्या या उपक्रमात नगरच्या मातीतील सुपूत्र व नगर जिल्ह्यातील पहिले भारतश्री शरीर सौष्ठवपटू शशिकांतजी खिस्ती यांची प्रकट मुलाखतीचे आयोजन 25 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा. एमआयडीसी येथील चिंतामणी आर्ट गॅलरी येथे संपन्न होणार असल्याचे संचालक चिन्मय सुकटनकर यांनी दिली.
प्रतिकूल परिस्थितीत 1991 साली शशिकांतजी खिस्ती यांनी आपल्या प्रचंड मेहनतीतून नगर जिल्ह्यात पहिल्या ‘भारतश्री’ खेचून आणला होता. हेच सातत्य त्यांनी पुढे चालू ठेवत खिस्ती हेल्थ क्लबच्या माध्यमातून हजारो युवकांना घडवित हे व्रत पुढे चालू ठेवले आहे. त्यांच्या अनुभवावर आधारित या प्रकट मुलाखतीत रसिक नगरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजिका शिल्पा रसाळ व संजय देळवी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here