जवळा गावात चोरट्यांनी सोनार दुकान फोडण्याचा केला प्रयत्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 23, 2021

जवळा गावात चोरट्यांनी सोनार दुकान फोडण्याचा केला प्रयत्न

 जवळा गावात चोरट्यांनी सोनार दुकान फोडण्याचा केला प्रयत्न नगरी दवंडी

जवळा ता. जामखेड 


जामखेड तालुक्यातील जवळा गावामध्ये रात्री सुमारे १ ते दीड वाजल्याच्या सुमारास दयानंद सुभाष कथले. यांचे सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला.सविस्तर माहिती अशी की रात्री १ ते दीड  सुमारास सोन्याच्या दुकान च्या आसपास राहणारे कुटुंबीयांना दुकानाच्या शटर तोडण्याचे व कुलूप तोडण्याचे आवाज आले. आवाज कश्यचा येतो याची खात्री केली असता   चोर आहेत व ते कुलूप  तोडत आहेत असा आवाज येऊ लागला.तत्काळ दुकान शेजारील कुटुंबीयांनी सदर सोन्याच्या दुकान मालकाला फोन केला व तुमच्या दुकानाचा शटर तोडल्याचा आवाज येतोय तुम्ही बाहेर या असे सांगितले .त्यानंतर लगेच दुकान मालक यांनी आरडा ओरडा केला .ते आवाज एकूण चोरट्यांनी चार चाकी गाडीच्या साह्याने धूम ठोकली व पसार झाले. तात्काळ पोलिसांशी संपर्क केला असता तात्काळ पोलिसांची गाडी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले व विचारपूस करत पाहणी केली. सुदैवाने यामध्ये कसलेही आर्थिक नुकसान झाले नाही. सतर्कता बाळगल्याने अनर्थ टळला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here