तरडगाव, दौण्डवाडी व वंजारीवाडी या ग्रामपंचायतमध्ये 10वर्षांनंतर सत्तेत परिवर्तन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 23, 2021

तरडगाव, दौण्डवाडी व वंजारीवाडी या ग्रामपंचायतमध्ये 10वर्षांनंतर सत्तेत परिवर्तन

 तरडगाव, दौण्डवाडी व वंजारीवाडी या  ग्रामपंचायतमध्ये 10वर्षांनंतर सत्तेत परिवर्तननगरी दवंडी

जामखेड प्रतिनिधी 


जामखेड तालुक्यातील खर्डा जिल्हा परिषद गटातील राजकीय दुष्टीनी अतिशय महत्त्वाचे आसणाऱ्या तरडगाव, दौण्डवाडी व वंजारीवाडी या ग्रृप ग्रामपंचायत निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते प्रा सचिनसर गायवळ यांच्या नेतृत्वाखाली व डॉक्टर जयराम खोत यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या करण्यात आलेल्या शेतकरी विकास पॅनला स्पष्ट बहुमत मिळाले असून गेल्या १० वर्षेची सतेत परीवर्तन सर्व मतदारांनी केले असून सहा उमेदवार विजयी झाले आहेत. 

या ग्रामपंचायती मध्ये रामा तात्या खोत, (बिनविरोध), खोत ज्योती जयराम, बांगर हर्षल (महेश) गोवर्धन, भास्कर पांडुरंग मुंढे, पवार सुमन बापुराव व दौंण्ड संगिता बबन असे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ व त्यांचे बंधु प्रा सचिन गायवळ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष  मंगेश आजबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवडणुकीत यांनी मोलाचे सहकार्य केल्यानीच हे सहा उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

 युवा नेते बाबासाहेब बांगर, चेअरमन प्रकाश ढोले, विकास ढोले, शहाजी केसकर, पोपट मुंढे, अरुण खोत, महादेव केसकर, उत्तरेश्वर तांदळे, सचिन बांगर, दत्ता अव्हाड, भाऊसाहेब खोत, ज्ञानदेव मुंढे, तागदे सर, केशव सानप, सिताराम तागदे, संतोष भोगील,चत्रभुज तांदळे, अशोक काळे, श्रीराम जाधव, यांनी विशेष सहकार्य केले आहे, 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here