‘अहमदनगर’ चं अंबिकानगर नामकरण करा. - शशिकांत गाडे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, January 23, 2021

‘अहमदनगर’ चं अंबिकानगर नामकरण करा. - शशिकांत गाडे.

 ‘अहमदनगर’ चं अंबिकानगर नामकरण करा. - शशिकांत गाडे.

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अंबिकानगर’ करण्यात यावे अशी मागणी शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात गाडे यांनी म्हटले आहे की,अहमदनगर जिल्हा व शहराचे नाव अंबिकानगर व्हावेत अशी स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. सभेत तमाम जनतेसमोर इच्छा व्यक्त केली होती. नगर शहराचे “अंबिकादेवी” दैवत असून सदरचा इतिहास हा मुघल काळाच्या अगोदरचा आहे. तमाम नगरकरांची अहमदनगरचे नाव अंबिकानगर करून जुना इतिहास लोकांपर्यंत जावा अशी इच्छा आहे.
तरी अहमदनगर जिल्हा व शहराचे नाव “अंबिकानगर” करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here