थिटेसांगवी ग्राम पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

थिटेसांगवी ग्राम पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

 थिटेसांगवी ग्राम पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

स्व.बबनराव (आण्णा) रामचंद्र शेळके यांच्या स्मरणार्थ दिला गेला जीवनगौरव व शौर्य पुरस्कार.



नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर नगरपालिका बांधकाम समितीचे मा.चेअरमन स्व.बबनराव (आण्णा) रामचंद्र शेळके यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा थिटेसांगवी ग्राम जीवनगौरव पुरस्कार दिगंबर संभाजी वाळके (गुरुजी) व थिटेसांगवी ग्राम शौर्य पुरस्कार प्रकाश उध्दव वाळके यांना थिटेसांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक पै.संग्राम बबनराव शेळके होते.प्रस्ताविक अनिल भोसले यांनी केले. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिगंबर वाळके गुरुजी यांना जीवनगौरव पुरस्कार व सीना मध्यम प्रकल्पात बुडत असताना जीव धोक्यात घालुन युवकाचे प्राण वाचवल्याबद्दल प्रकाश उध्दव वाळके यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिआरपीएफ मध्ये निवड झाल्याबद्दल नवनाथ संजय देवकाते यांचाही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पोलिस पाटील शिवाजी वाळके, ग्रामसेवक दत्तात्रय वाघ,ग्रा. प.सदस्य जालिंदर वाळके,लक्ष्मण वाळके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय बागल, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब उगले, ग्रा.प.सदस्य गोरख वाळके, विष्णू वाळके, उद्योगपती रामदास बागल, मधुकर उगले, दयानंद शेळके, ज्ञानदेव शेळके,दिलीप देवकाते सर, विठ्ठल जरांगे, अशोक ब.वाळके, तुकाराम वाळके, आत्माराम ससाणे सर, भाऊसाहेब वाळके, शंकर वाळके, अशोक लक्ष्मण वाळके, नारायण वाळके, ज्ञानेश्वर वाळके, मेजर संदिप देवकाते, नामदेव देवकाते, सागर देवकाते आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. पुरस्कार्थी मानकरी यांचे अभिनंदन ज्येष्ठ नेते पांडाभाऊ उगले, बलभिम (आप्पा) शेळके, अर्जुनदेवा शेळके,किसनदादा उगले, डॉ.बाळासाहेब उगले, डॉ.अविनाश वाळके, ज्ञानदेव देवकाते, पै.शिवाजी बबनराव शेळके, बलभिम वाळके सर, ग्रामविकास अधिकारी श्याम भोसले, ेंएलआयसी विभागीय अधिकारी योगेश उगले, शिवव्याख्याते प्रा.कानिफनाथ उगले आदींनी केले.आभार शिवाजीराजे वाळके यांनी मानले. सोशल डिस्टंसिंग नियमांचे पालन करुन सदर कार्यक्रम घेण्यात आला होता.

No comments:

Post a Comment