दैनिक ‘नगरी दवंडी’चे संपादक राम नळकांडे यांचा राज्य मराठी पत्रकारसंघाचेवतीने पारनेरमध्ये सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

दैनिक ‘नगरी दवंडी’चे संपादक राम नळकांडे यांचा राज्य मराठी पत्रकारसंघाचेवतीने पारनेरमध्ये सत्कार

 दैनिक ‘नगरी दवंडी’चे संपादक राम नळकांडे यांचा राज्य मराठी पत्रकारसंघाचेवतीने पारनेरमध्ये सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः दैनिक नगरी दवंडीचे संपादक राम नळकांडे यांनी आज पारनेर तालुक्यामधे भेट दिली. पारनेर मधे नगरी दवंडीच्या माध्यमातुन सर्व प्रतिनिधींनी आजवर खुप समाधानकारक काम केल्याची भावना यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली.नगरी दवंडीचे तालुका प्रतिनिधी संतोष सोबले यांचेही काम चांगले असुन,भविष्यामधे दैनिक नगरी दवंडीच्या सर्व पत्रकारांचे पाठीमागे सर्व शक्तीनिशी उभा राहिल. पत्रकारांना सध्या अनेक अडी अडचणींना तोंड द्यावे लागते.
त्यातुन प्रसंगी स्वत:च्या खिशाला झळ देत पत्रकार खेडोपाडी काम करत असतो.खेड्यातील सर्व प्रश्नांचा अभ्यास करत पत्रकार ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करतात.समाजातील विविध प्रश्नावर नेहमीच पत्रकार आवाज उठवत असतो.अनेकदा समाजातील खरे स्वरुप मांडताना पत्रकारांना अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते.अशावेळी पत्रकाराचे मागे पूर्ण ताकतीनिशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाचे वतीने तालुकाध्यक्ष दत्ता गाडगे यांचे शुभहस्ते संपादक राम नळकांडे यांचा सन्माण करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका  अध्यक्ष ढत्ता गाडगे,पत्रकार व दैनिक नगरी दवंडीचे तालुका प्रतिनिधी संतोष सोबले,प्रसिध्दीप्रमुख श्रीनिवास शिंदे आदींसह दैनिक नगरी दवंडीचे प्रतिनिधी व पत्रकारमित्र उपस्थित होते.

No comments:

Post a Comment