पक्षाच्या सर्वात महत्वाचा घटक हा बुथ सदस्य- रवी अनासपुरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

पक्षाच्या सर्वात महत्वाचा घटक हा बुथ सदस्य- रवी अनासपुरे

 भाजपचा शहर जिल्हा बुथ संपर्क अभियानास प्रारंभ 

पक्षाच्या सर्वात महत्वाचा घटक हा बुथ सदस्य- रवी अनासपुरे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
बुथ समित्या या सतत कार्यरत राहिल्या पाहिजे, त्यासाठी वरिष्ठांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन, या बुथ समित्या सक्षम कराव्यात. प्रत्येक बुध सदस्यांनी आपआपल्या भागातील पक्षाचे समर्थक यांना नमो अ‍ॅप द्वारे शासनाची माहिती पोहचवावी. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांना ऐकावयास सांगावे. भाजपा सरकारच्यावतीने केंद्राच्या योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहचवून त्यांचा लाभ त्यास मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. पक्षाची ध्येय-धोरणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम बुथ सदस्यांनी करावे. भाजपा पक्षाच्या सर्वात महत्वाचा घटक हा बुथ सदस्य असल्याने या सदस्यांच्या जोरावरच पक्षाची वाटचाल सुरु आहे. बुथ सदस्यांना मार्गदर्शन व ताकद देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरुन करण्यात येईल, असे प्रतिपादन संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी केले.
    शहर जिल्हा भाजपच्या बुथ संपर्क अभियानाचा शुभारंभप्रसंगी प्रदेश भाजपचे बुथ प्रभारी राजेंद्र फडके, संघटन मंत्री रवी अनासपुरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे,खासदार डॉ सुजय विखे ,नगर जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी , शहर जिल्हा प्रभारी मनोज पांगरकर, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, उपाध्यक्ष संतोष गांधी, शिवाजी दहिंडे, संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, जिल्हा सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, सुरेखा विद्ये, नरेंद्र कुलकर्णी, महिला अध्यक्षा अंजली वल्लाकट्टी, सचिन पारखी, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, शुभांगी साठे, प्रदेश संयोजक गीतांजली ठाकरे, नुपूर सावजी, उत्तर महाराष्ट संयोजक विशाल जाधव आदि उपस्थित होते.
   याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे म्हणाले, पक्षाच्यावतीने राबविण्यात येणारे उपक्रम नगर शहरात राबवून पक्षाशी जास्तीत जास्त कार्यकर्ते व लोकांना जोडण्याचे काम सुरु आहे. गेल्या वर्षभरात शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, केंद्र सरकारची वर्षपूर्ती त्याचबरोबरच कोरोनाच्या काळातही नागरिकांना आर्सिनिक गोेळ्यांचे वाटप, सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. कोविड सेंटरची उभारणी करुन 100 बेडची व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे दूध दरवाढ, वीज दरवाढीचा राज्य सरकार विरोधात आंदोलन करुन नागरिकांच्या समस्यांला वाचा फोडण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून केले गेले. शहरातील बुथ समित्या सक्षम असून, व्हॅटस्अप ग्रुपच्या माध्यमातून आपआपल्या भागातील नागरिकांच्या संपर्कात असून, केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र फडके, प्रा.राम शिंदे, महापौर बाबासाहेब वाकळे आदिंनी बुथ समिती सदस्यांना मार्गदर्शन करुन पक्षावाढीसाठी करण्यात येणार्या उपक्रमांनाठी सहकार्य राहील, असे सांगितले.

No comments:

Post a Comment