महेश सातपुते यांच्या पर्यावरणपुरक पेन्सिलचे खा.शरद पवारांच्या हस्ते लॉचिंग - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

महेश सातपुते यांच्या पर्यावरणपुरक पेन्सिलचे खा.शरद पवारांच्या हस्ते लॉचिंग

 महेश सातपुते यांच्या पर्यावरणपुरक पेन्सिलचे खा.शरद पवारांच्या हस्ते लॉचिंग


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः शहरातील सिव्हिल इंजिनिअर तसेच उद्योजक महेश सातपुते यांनी कागद व वेलवेट पासून वहीवर लिहिण्याची पेन्सिल तयार करण्याचा अनोखा प्रयोग केला आहे. नुकतेच नगरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अक्षर नंदिनी एंटरप्राइजेस अंतर्गत नंदिनी पेन्सिलचा लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी  पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, दादाभाऊ कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात असा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे. या पेन्सिलच्या उपयोग लोअर केजी पासून सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट यांना अत्यंत उपयोगी पडणारी व गरजेची वस्तू बनवण्याचा अभिनव प्रयोग सिव्हिल इंजिनिअर महेश सातपुते यांनी यशस्वी केला आहे. स्वतः महेश सातपुते हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. कागद वेलवेट पासून पेन्सिल तयार केल्यामुळे प्रदूषण चांगले राहण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. कागदापासून पेन्सिल तयार केल्यामुळे वृक्षतोड थांबेल व प्रदूषण कमी होईल असं त्यांचं मत आहे. या पेन्सिलमध्ये विविध प्रकार आहेत पॉलिमर पेन्सिल, वेलवेट पेन्सिल अशा प्रकारचे विविध प्रकारचे व्हरायटीज आहेत, पण त्यांनी प्रदूषण थांबण्यासाठी कागद पेन्सिल बनवण्याचा ध्यासच घेतला होता.
    याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या पर्यावरणपूरक पेन्सिलचे कौतुक करुन अशा उपक्रमांमुळे पर्यावरणाचा र्हास थांबून नवनवीन उद्योगांना चालना मिळेल, असे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here