हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने पोपटराव पवारांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, January 25, 2021

हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने पोपटराव पवारांचा सत्कार

 हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने पोपटराव पवारांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श गाव हिवरे बाजारचे प्रवर्तक तथा आदर्श गाव संकल्प व कार्य समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.
नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली पॅनल विजयी झाल्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे मन्सूर शेख यांनी त्यांचा सत्कार केला.
   यावेळी अकलाख शेख, आफताब शेख, प्रियंका धारवाले, निलेश आगरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोपट पवार म्हणाले की, आतापर्यंत हिवरे बाजारला निवडणुका बिनविरोध होत होत्या. या वेळी लोकांची इच्छा पाहून निवडणूका होऊ दिल्या. यामध्ये लोकांनी विकासाला शिक्कामोर्तब केले यातून आत्मपरीक्षण करता आले. या विजयाने पुढील कामाची दिशा निश्चित करण्यास मदत होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here