युवकांना राजकारणातून सामाजिक कार्याची संधी : नगरसेवक कुमारसिंह वाकळे
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राजकारणामध्ये युवक मोठ्या संख्येने येत असून त्यांनी या संधीचा फायदा सामाजिक कार्यासाठी करणे गरजेचे आहे. पद हे नुसते नावापुरते व लेटर पॅडवर छापण्यापुरते मर्यादित न ठेवता समाजाचे प्रश्न सोडवावे. समाजामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत. आजच्या युवकांनी राजकारणाच्या माध्यमातून हे प्रलंबित प्रश्न सोडवू शकतात. यावर्षी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने युवकांना जनतेने निवडून दिले आहे. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला पात्र राहून काम करावे. नवनागापूर ग्रामपंचायत ही नगर जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे स्त्रोत असल्यामुळे या भागाच्या विकासाला राजकीय मतभेद बाजुला ठेवून चालना द्यावी, असे प्रतिपादन नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी केले.
नवनागापूर ग्रामपंचायतच्या सदस्यपदी सागर सप्रे पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना नगरसेवक कुमारसिंह वाकळे पाटील, अॅड. निखिल वाकळे पाटील, अमित वाघमारे, प्रशांत बेल्हेकर, भाऊ पुंड, प्रथमेश ओटी, मुन्ना शेख आदी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment