प्रजासत्ताक दिनी बुरुडगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

प्रजासत्ताक दिनी बुरुडगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 प्रजासत्ताक दिनी बुरुडगाव येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर ः प्रजासत्ताक दिन व नगरसेवक गणेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी दि.26 जानेवारी रोजी बुरुडगाव रोड येथील कै. पुंडलिकराव भोसले स्केटिंग रिंग येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन टीम टॉपर्सचे अध्यक्ष प्रशांत पाटोळे यांनी केले आहे. ही स्पर्धा चार गटात होणार आहे. बालवाडी ते तिसरी अ गटासाठी विषय- माझे आवडते कार्टून, भारतीय राष्ट्र ध्वज व माझा काल्पनिक हिरो, चौथी ते सातवी ब गटासाठी विषय- ध्वजारोहन, माझे स्वप्न, लॉकडॉउन मधील एक वेळ, आठवी ते बारावी क गटासाठी विषय- स्वच्छ भारत, वृक्षरोपण, कोरोना योद्धा व खुला ड गटसाठी निसर्ग रम्य दृश्य हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment