सारडा महाविद्यालयाच्या 5 प्राध्यापकांना प्रोफेसरपदी पदोन्नती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

सारडा महाविद्यालयाच्या 5 प्राध्यापकांना प्रोफेसरपदी पदोन्नती

 सारडा महाविद्यालयाच्या 5 प्राध्यापकांना प्रोफेसरपदी पदोन्नती


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः पेमराज सारडा महाविद्यालयाच्या 5 प्राध्यापकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून नुकतीच प्रोफेसर पदावर पदोन्नती मिळाली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे (अर्थशास्त्र ), डॉ.गिरीष कुलकर्णी व डॉ.ज्योती बिडलान (राज्यशास्त्र), डॉ.महेश्वरी गावित (मराठी) व डॉ.माधुरी दिक्षित (इंग्रजी) यांची प्रोफेसर पदी पदोन्नती झाली आहे. याबद्दल सारडा महाविद्यालयात झालेल्या सत्कार समारंभात हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, माजी कार्याध्यक्ष ब्रिजलाला सारडा यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी मंडळाचे संचालक प्रा.सुजित बेडेकर, प्रा.मकरंद खेर, डॉ.पारस कोठारी, मधुसूदन सारडा, रणजीत श्रीगोड, बी.यू.कुलकर्णी, प्रबंधक अशोक असेरी, वरद जोशी आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलतांना प्रा. शिरीष मोडक म्हणाले, सारडा महाविद्यालाच्या 5 प्राध्यापकांनी अतिशय कठीण परिक्षेत उतीर्ण होत प्रोफेसर पदाचा बहुमान मिळवला आहे. पेमराज सारडा महाविद्यालयाने  आधीपासूनच पीएचडी धारक डॉक्टरांचे महाविद्यालय असा लौकिक मिळवला आहे. आता उच्चविद्याविभूषित प्रोफेसरांचे महाविद्यालय असा नावलौकिक प्राप्त करेल यात शंका नाही. या महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थीही चांगले ज्ञान घेवून बाहेर पडत आहे. हिंदसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचा शैक्षनिक दर्जा उंचावण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. संजय जोशी म्हणाले, सारडा महाविद्यालयाचा शैक्षनिक दर्जा वाढण्यासाठी सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळत आहेत. महाविद्यालयाचे प्राध्यापकही तळमळीने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत. अजित बोरा म्हणाले, सारडा महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांनी चांगली महेनात घेवून प्रोफेसर पदावर बढती मिळवली आहे. याचा हिंदसेवा मंडळाच्या पदाधीकारीना व संचालकांना अभिमान आहे. कार्याक्रमचे सुत्रसंचलन अंकुश आवारी यांनी केले, आभार प्रबंधक अशोक असेरी यांनी मानले.

No comments:

Post a Comment