कोविशील्ड लसीमुळे कोरोनाशी लढण्यास बळ मिळेल : सभापती मनोज कोतकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 18, 2021

कोविशील्ड लसीमुळे कोरोनाशी लढण्यास बळ मिळेल : सभापती मनोज कोतकर

 कोविशील्ड लसीमुळे कोरोनाशी लढण्यास बळ मिळेल : सभापती मनोज कोतकर

केडगाव येथे लसीकरणाचा शुभारंभ

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः संपूर्ण जगात गेल्या 9 महीन्यांपासून थैमान घालणार्‍या कोविड - 19 या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण मानवजात भयभीत झाली होती. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर पावले उचलत याबाबत उपाय योजना केल्या. संपूर्ण देशवासियांनी या टाळेबंदीच्या भयानक स्थितीला भक्कमपणे सामोरे गेले. महाभयंकर विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या देशातील तज्ञांनी अहोरात्र परिश्रम घेऊन रामबाण लस शोधली. या कोविशील्ड लसीमुळे कोरानाशी लढण्यासाठी निश्चीत बळ मिळेल असा विश्वास महानगर पालिका स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी व्यक्त केला.
   शासन निर्देशानुसार केडगाव येथे आरोग्य सेवकांना लसीकरणाचा शुभारंभ सभापती मनोज कोतकर यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
   श्री कोतकर पुढे म्हणाले की, कोविशील्डचे लसीकरण आता प्रत्यक्षात सुरु झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची जनतेच्या मनात असलेली भीती कमी होईल. मात्र अजूनही काळजी घेणे आवश्यक आहे. या लसीमुळे जनजीवन लवकरच पूर्वपदावर येऊन बाजारपेठेत चैतन्य निर्माण होईल असा विश्वास श्री कोतकर यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी महिला बाल कल्याण समिती सभापती लताताई शेळके, डॉ. गिरीश दळवी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment