इंदापूरचा सोनाई दुध हा ब्रँड नगरकरांच्या पसंतीस उतरेल : मुश्रीफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

इंदापूरचा सोनाई दुध हा ब्रँड नगरकरांच्या पसंतीस उतरेल : मुश्रीफ

 इंदापूरचा सोनाई दुध हा ब्रँड नगरकरांच्या पसंतीस उतरेल : मुश्रीफ

अजिंक्य एन्टरप्रायजेसच्या माध्यमातून सोनाई दुध व दुग्धजन्य डेअरीचे उद्घाटन

अहमदनगर ः
शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीचा व्यवसाय निवडावा. व्यवसाय करीत असताना जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश संपादन करता येते. व्यवसायातून रोजगार निर्मिती होऊन युवकांना रोजगार मिळतो. सोनाई दूध व दुग्धजन्य पदार्थ हे राज्यातील दर्जेदार, स्वादिष्ट निर्मितीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या तसेच या क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या इंदापूरचा ब्रॅड आहे. व्यवसायाच्या प्रगतीमुळे देशाच्या आर्थिक विकासामध्ये आपलाही सहभाग येतो. इंदापूरचा सोनाई दुध हा ब्रँड नगरकरांच्या पसंतीस उतरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

   तारकपूर रोडवरील अजिंक्य एन्टरप्रायजेसच्या माध्यमातून सोनाई दुध व दुग्धजन्य डेअरीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आ. अरुणकाका जगताप, आ. संग्राम जगताप, संग्राम कोते, नगरसेविका शोभाताई बोरकर, संचालक अजिंक्य बोरकर, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, रनगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, कुमार वाकळे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनित पाऊलबुद्धे, बाळासाहेब बारस्कर, बाळासाहेब जगताप, उबेद शेख, सुमित कुलकर्णी, सुनील त्रिंबके, गजेंद्र भांडवलकर, ठाकुर नवलानी, सुरेश हिरानंदानी, दामु भटेजा, नानकराम मटलाई, रुप मोटवानी, मुरलीधर कराळे, प्रभाकर बोरकर, गिरीष नवलानी, सनी आहुजा, सावंत छाबरा आदी उपस्थित होते.
   यावेळी बोलताना आ. अरुणकाका म्हणाले की, अजिंक्य एन्टरप्रायजेसच्या माध्यमातून दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्री व्यवसायामध्ये ग्राहकांना उत्तम सेवा देऊन विश्वास संपादन करावा. सोनाई दुधाचे विविध उत्पादन उत्तम दर्जाचे आहेत. ते नगरकरांना नक्कीच आवडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संचालक अजिंक्य बोरकर म्हणाले की, ग्राहकसेवा हीच ईश्वर सेवा मानून सोनाई दुध व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत सेवा देण्याची संधी मिळाली आहे. त्याचे आम्ही नक्कीच सोने करू. लवकरच घरपोच सुविधा सुरु करु. सोनाई दुधापासून तयार झालेले विविध उत्पादन आमच्याकडे उपलब्ध आहेत. सोनाईचे दुध हे उत्तम दर्जाचे व आरोग्यास लाभदायक असल्याचे ते म्हणाले. नगरसेविका शोभाताई बोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment