वडारवाडी ग्रामपंचायत नूतन सदस्या सौ.सरोज परदेशी यांचा राजपूत ठाकूर समाजाच्यावतीने सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

वडारवाडी ग्रामपंचायत नूतन सदस्या सौ.सरोज परदेशी यांचा राजपूत ठाकूर समाजाच्यावतीने सत्कार

 वडारवाडी ग्रामपंचायत नूतन सदस्या सौ.सरोज परदेशी यांचा राजपूत ठाकूर समाजाच्यावतीने सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर तालुक्यातील वडारवाडी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या चुरसीच्या व अटीतटीच्या निवडणूकीत महिला राखीव प्रभागातून सौ.सरोज उदयभानसिंह परदेशी या निवडून आल्या. या निवडीबद्दल सौ. सरोज परदेशी यांचा राजपूत ठाकूर समाजाच्यावतीने ज्येष्ठ कार्यकर्ते नंदूभैय्या परदेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुभाषसिंह ठाकूर, श्रीपादसिंह ठाकूर, श्री राजपूत करणी सेनेचे कार्याध्यक्ष किसनसिंग परदेशी, भिंगार अध्यक्ष प्रितमसिंग परदेशी, उपाध्यक्ष अमोलसिंग ठाकूर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी नंदूभैय्या परदेशी म्हणाले, आज जमाना बदलला आहे, पुरुषांबरोबर महिलाही विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. राजकारणातही आपल्या कार्याने त्यांनी वेगळा ठसा उमटविला आहे. गावपातळीवर महिलांना प्रतिनिधीत्व मिळत असल्याने गावाच्या विकासात महिलांची भुमिका महत्वाची ठरत आहे. त्यातून गावाचा विकास होत आहे. सौ.सरोज परदेशी यांनीही गावात महिलांचे चांगले संगठन केले आहे. त्यामुळे गावकर्यांनी त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना निवडून दिले आहे. गावाच्या विकासात त्या यापुढील काळात चांगले योगदान देतील, असे सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देतांना सौ. सरोज परदेशी म्हणाले, गावातील कार्यात महिलांचे योगदान असावे, महिलांच्या समस्यां सोडविल्या जाव्यात यासाठी यापुढे कार्यरत राहू. वडारवाडी गावाचा विकासात महत्वपूर्ण कार्य करण्याचा आपला संकल्प आहे. आज समाजाच्यावतीने माझा सत्कार केल्याने प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाषसिंह ठाकूर यांनी केले तर आभार किसनसिंग परदेशी यांनी मानले. याप्रसंगी समाज बांधव उपस्थित होते.

No comments:

Post a Comment