सामाजिक कार्यात सातत्य ठेवले पाहिजे ः मिटके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

सामाजिक कार्यात सातत्य ठेवले पाहिजे ः मिटके

 सामाजिक कार्यात सातत्य ठेवले पाहिजे ः मिटके


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः आपण करत असलेल्या नोकरी, व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होऊन, समाजातील वंचित घटकांसाठी कार्य केले पाहिजे. अहमदनगर सोशल फौंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेले सामाजिक कार्यात समाजात सलोखा निर्माण होत आहे, ही एक चांगली बाब आहे. फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद असेच आहे हे कार्य यापुढेही असेच सुरु ठेवावे, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी केले.
   अहमदनगर सोशल फौंडेशनच्या कार्यालयास उपाधिक्षक संदिप मिटके यांनी भेट देऊन अध्यक्ष नईम सरदार यांच्याशी वार्तालाप केला. नईम सरदार यांनी फौंडेशनच्यापवतीने सुरु कार्याची माहिती दिली व असेच मार्गदर्शन आपण करत राहिल्या कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते असे सांगितले. यावेळी उपाधिक्षक संदिप मिटके यांना झी टीव्हीचा ‘महाराष्ट्राची शान’ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करुन सत्कार केला.

No comments:

Post a Comment