नायलॉन मांज्यावर शहरात पूर्णत: बंदी आणण्याची युवा सेनेची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

नायलॉन मांज्यावर शहरात पूर्णत: बंदी आणण्याची युवा सेनेची मागणी

 नायलॉन मांज्यावर शहरात पूर्णत: बंदी आणण्याची युवा सेनेची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पशु-पक्ष्यांसह मनुष्यांच्या जीवावर बेतणार्या नायलॉन (चायना) मांजावर शहरात पूर्णत: बंदी आनण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन युवा सेनेचे सावेडी विभाग प्रमुख महेश शेळके यांनी महापालिकेत दिले. हिंदूंच्या सणावर चायनाचे विघ्न नको असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी युवकांमध्ये जनजागृती करण्याचे स्पष्ट केले.
   मकरसंक्रांति निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येतात. पतंग कापली जाऊ नये यासाठी युवक नायलॉन (चायना) मांजाचा वापर करीत आहे. हा मांजा सहजासहजी तुटत नसल्याने, अनेक पशु-पक्ष्यांना इजा होत आहे. अनेक पक्ष्यांची या मांजामुळे पंख, मान कापली गेली आहेत. या नायलॉन मांजाच्या वापरामुळे पशुपक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला असून, पशु-पक्षी मरण देखील पावले आहेत. तसेच या मांज्याने अनेक व्यक्तींचा गळा, हात कापले जाण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना अपंगत्व आले आहे, तर काही मृत्यूमुखी देखील पडले आहेत. अंध व्यक्तींनाही याचा मोठा धोका निर्माण झालेला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन नायलॉन (चायना) मांजावर शहरात पूर्णत: बंदी आनण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment