नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शिबीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, January 9, 2021

नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शिबीर

 नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शिबीर

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशन च्यावतीने रविवार दि.10/1/2021 रोजी मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळ येथील  संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित केलेले आहे. तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले आहे.
   सदर शिबीरात सर्व रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येऊन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासेल अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येईल. रुग्णांची राहणे, जेवणाची मोफत व्यवस्था करण्याची आलेली आहे.
तरी सर्व गरजू रुग्णांनी नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्री. जालिंदर बोरुडे मो.नं. 9881810333 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment