एचआयव्हीबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक ः आरती शिंदे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

एचआयव्हीबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक ः आरती शिंदे

 एचआयव्हीबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक ः आरती शिंदे

एड्स जनजागृती पंधरवडा उपक्रमांतर्गत युवक-युवतींमध्ये एड्सबद्दल जागृती निबंध, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धेला प्रतिसाद

नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः एचआयव्ही बाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक असून, याबाबत जागृती करण्याची गरज आहे. हा आजार एकत्र वावरल्याने, बोलण्यातून, हस्तांदोलनातून, एकत्र सहवासातून होत नसून, याचा संसर्ग असुरक्षित संबंधातून, बाधित मातेकडून बालकाला, दूषित रक्त संक्रमणातून होत असतो. हा रोग टाळण्यासाठी जनजागृती व उपयायोजना हाच एकमेव पर्याय आहे. याची शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी करुन औषधोपचारही देण्यात येते. विवाहपूर्व युवक-युवतींनी एचआयव्ही तपासणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उडान फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले.
   महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमीच्या वतीने भागीरथी तनपूरे कन्या महाविद्यालयात आयोजित एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमात शिंदे बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य उषा शेंडगे, प्रा. बाळासाहेब निवडूंगे, प्रा. दामिनी म्हस्के, मंगल आढाव, कलाध्यापक प्रशांत सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक किशोर शिंदे, आरोग्य विभागाच्या समुपदेशक अश्विनी घोरपडे, सारिका मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी युवक-युवतींसाठी घेण्यात आलेल्या एचआयव्ही-एड्स जनजागृतीवर निबंध, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धेला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. भानुदास होले, पोपट बनकर, अ‍ॅड. सुनिल तोडकर, रमेश गाडगे आदींचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment