स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारनेर तालुका युवक अध्यक्षपदी गंधाक्ते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, January 25, 2021

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारनेर तालुका युवक अध्यक्षपदी गंधाक्ते

 स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारनेर तालुका युवक अध्यक्षपदी गंधाक्ते


नगरी दवंडी/
प्रतिनिधी
अहमदनगर ः स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारनेर तालुका युवक अध्यक्षपदी प्रशांत गंधाक्ते यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा युवक अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी गंधाक्ते यांच्या निवडीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
   संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.कृषिराज टकले यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील युवकांना संघटित करुन संघटनेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार असून, ही चळवळ बळकट करण्यासाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार असल्याची भावना प्रशांत गंधाक्ते यांनी निवडप्रसंगी व्यक्त केली. या निवडीबद्दल संघटनेचे पारनेर तालुकाध्यक्ष निलेश दरेकर, जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे आदींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment