ओबीसी, व्हीजे,एनटी,ची जनगणना सुरु करुन समाजाला न्याय द्यावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, January 27, 2021

ओबीसी, व्हीजे,एनटी,ची जनगणना सुरु करुन समाजाला न्याय द्यावा

 ओबीसी, व्हीजे,एनटी,ची जनगणना सुरु करुन समाजाला न्याय द्यावा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर -  देश स्वतंत्र होऊन 73 वर्षेलोटली मात्र देशातील ओबीसी, व्हीजेएनटी समाजाला न्याय मिळाला नाही. आज प्रजासत्ताकदिना निमित्त केंद्र सरकारने ओबीसी व्हीजेएनटी चे जनगणना सुरु करावी, असे मत बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष माऊली गायकवाड यांनी केले. संघटनेच्यावतीने नगरमध्ये पहिला  प्रजासत्ताकाच्या ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी माऊली गायकवाड बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणून उपस्थित होते.
नुकताच शहरात ओबीसी, व्हीजेएनटी मेळावा पार पडला. या मेळाव्याबाबत सर्व श्रेष्ठींनी अनुकूल मत प्रदर्शित केल्याने नगरच्या संघटनेचा हुरूप वाढला असून लवकरच कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष श्री.भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यापुढील काळात सामाजिक उपक्रम, थोर पुरुषांच्या जयंत्या, स्मृतीदिन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
यावेळी  सलून असोसिएशनचे अध्यक्ष अनिल निकम,  खान्देश मंचे अध्यक्ष रामदास आहेर, श्रीकांत मांढरे, रमेश सानप, राजेंद्र पडोळे, शामराव औटी, अनिल इवळे, माजी नगरसेवक सुनील भिंगारे, शशिकांत पवार, अभिजित कांबळे, डॉ.सुदर्शन गोरे आदी उपस्थित होते. मठ मंदिर समितीचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर भगवान बाबा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here