इंजिनिअर महेश सातपुते यांनी साकारली पर्यावरण पूरक पेन्सिल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

इंजिनिअर महेश सातपुते यांनी साकारली पर्यावरण पूरक पेन्सिल

इंजिनिअर महेश सातपुते यांनी साकारली पर्यावरण पूरक पेन्सिल

 खा. शरद पवार यांच्या हस्ते लाँचिंग संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगरमधील सिव्हील इंजिनिअर तसेच मनपा पाणी पुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते यांचे चिरंजीव महेश सातपुते यांनी कागद व वेलवेटपासून वहीवर चालणारी पेन्सिल तयार करण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे. लोअर केजी ते इंजिनिअर, आर्किटेक्टस् यांना अत्यंत उपयोगी ठरेल, अशी ही पेन्सिल आहे. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा अभिनव प्रयत्न करण्यात आला आहे. या पेन्सिलला नंदिनी पेन्सिल असे नाव देण्यात आले.
   सर्वांना अत्यंत उपयुक्त पडू शकेल, अशा अक्षर नंदिनी एंटरप्राईजेस अंतर्गत नंदिनी पेन्सिलचा लाँचिंग कार्यक्रम नगरमध्ये आयोजित खाजगी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ, ना. प्राजक्त तनपुरे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. नीलेश लंके, दादा कळमकर आदी उपस्थित होते.
नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात अशा प्रकारचा प्रयोग प्रथमच करण्यात आला असून, लोअर केजीपासून इंजिनिअर व आर्किटेक्टस् यांना अत्यंत उपयोगी पडणारी व गरजेची वस्तू बनवण्याचा अभिनव प्रयोग श्री. सातपुते यांनी पूर्णत्वास नेला आहे. कागदापासून पेन्सिल तयार केल्याने वृक्षतोड थांबेल व प्रदूषण कमी होईल, असे श्री. सातपुते यांचे मत आहे. या पेन्सिलमध्ये विविध प्रकार असून, विविध गुण वैशिष्ट्यांसह उत्पादित केलेल्या या पेन्सिलमध्ये असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत, असे श्री. सातपुते म्हणाले. या पर्यावरण पूरक नंदिनी पेन्सिलचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून उद्योजक सातपुते यांच्या यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

No comments:

Post a Comment