केडगाव प्रभाग समिती कार्यालयाच्यावतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

केडगाव प्रभाग समिती कार्यालयाच्यावतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार

 केडगाव प्रभाग समिती कार्यालयाच्यावतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार


नगर :
महापालिकेच्या माध्यमातून मला दोनदा महापौरपद मिळाले. त्या माध्यमातून नगरकरांची सेवेची संधी मिळाली. या संधीच्या जोरावर नगरकरांनी मला दुसर्‍यांदा आमदारकीच्या पदावर विराजमान केले. याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. महापालिका ही आपल्या सर्वांची कुटुंब आहे. तरी आपण सर्वांनी मिळून नगर शहराच्या विकासाला चालना देऊ. केडगावच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. तुम्ही कोणालाही घाबरू नका, आपल्या कामाशी काम ठेवा व केडगावकरांचे प्रशन मार्गी लावा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभा आहे. तुमचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम माझे आहे. महापालिका ही सेवा देणारी संस्था आहे. कामांच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नागरिकांनाही नियमांचे पालन करण्याची सवय लावावी. प्रत्येक अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपली दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. आपल्या सर्वांना बरोबर घेऊन शहराचे विकासातून रुप बदलायचे आहे. पुढील दोन वर्षामध्ये विकसित नगर करणार असल्याचे
प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
केडगाव प्रभाग समिती कार्यालयाच्यावतीने सहावा व सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल आ. संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, नगरसेवक अजिंक्य बोरकर, गणेश नन्नवरे, आस्थापन विभागप्रमुख मेहेर लहारे, भूषण गुंड, अफजल शेख, उबेद शेख, बाळासाहेब जगताप, विभागप्रमुख सुखदेव गुंड, बाजीराव येवले, अशोक कराळे, रमेश कोतकर, विजय कोतकर, विजय कराळे, केशव हराळ, सुनील सातपुते, महेश पवार, बाबासाहेब राशीनकर, भरत काकडे, रवींद्र कोतकर, आबासाहेब होळकर, राजेंद्र गुंड, नरेंद्र लगड, सर्जेराव पवार, अजित कोतकर, महेश गुंड, सोन्याबापू घेबूड, तुकाराम कोतकर शरद लगड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment