कोरठण खंडोबा श्रद्धा व भक्तीची यात्रा मोजक्या मानकरी लोकांमध्ये होणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

कोरठण खंडोबा श्रद्धा व भक्तीची यात्रा मोजक्या मानकरी लोकांमध्ये होणार

 कोरठण खंडोबा श्रद्धा व  भक्तीची यात्रा मोजक्या मानकरी लोकांमध्ये होणार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रासह अनेक राज्यामधील लोकांमध्ये श्री खंडोबा देवाला कुलदैवत मानलेले आहे. श्रीखंडोबा हा भगवान श्री शंकराचा अवतार आहे. मनी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी, ऋषीमुनीतसेच देवदेवता यांचे विनंतीवरुन भगवान श्री शंकाने मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला.मार्तंड भैरवाच्या या अवतारात श्री खंडोबाने, मनी व मल्ल या दैत्यांचा सहा दिवस चाललेल्याया युध्दात संहार करुन सर्व ऋषीमुनी देवदेवतांना संतुष्ट केले.या युध्दात श्री खंडोबाच्या सैन्याचा चंपाषष्ठीला मोठा विजय झाला, म्हणुन सर्व ऋषीमुनी व देवदेवतांनी सदा अनंदराचा येळकोट, येळकोटयेळकोट जय मल्हार! असा विजयाचा जयघोष केला. म्हणून भाविक भक्त तळीभंडार करताना, सदाआनंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले, अंबाबाईचा उदोउदो असा जयघोष करतात.
संपुर्ण भारत देशात अनेक मंदिरांमध्ये घडवून बसविलेल्या मुर्ती आहेत. तसेच स्वयंभूतांदळारुपातील मुर्ती असलेली ही मंदिरे आहेत. या सर्व मुर्तीच्या मुळ स्वरुपात बदल करता येत नाही. परंतू कोरठणच्या खंडोबाच्या बाबतीत आगळे वेगळे महत्व आहे. येथील तांदळा स्वरुपातील मुर्तीचे रुप रोज नव्याने, हाताचे बोटांनी साकारले जाते. आदल्या दिवसाचे स्वरुप, दुसर्या दिवशी सकाळी तांदळा मुर्तीला,पुजारी पाण्याने संपुर्ण अंघोळ घालुन धुवून काढतात.चंदन उगाळुन त्यामध्ये चांदीचे डोळे बसवितात.गंधाने देवाचे मुख, नाक इत्यादी, हाताचे बोटाने अधोरेखीत करतात. तांदळामुर्ती वरील दोन्ही बाजुला स्वयंभू रुपातील बाणाई व म्हाळसा यांनाही गंध लावून अधोरेखीत करतात. शाल चढवून पगडी ठेवतात, त्यावर फुलांची शेज लावतात, व हार घालतात. तेव्हा देवाचे स्वरुप नव्याने साकारलेले दिसते. संपुर्ण भारतात, रोज नव्याने देवाचे स्वरुप साकारणारी ही एकमेव स्वयंभू तांदळामुर्ती असावी.यात्रा कालावधीमध्ये स्वयंभू तांदळामुर्तीवरचांदीची सिंहासन पेटी ठेवतात. त्यावर देवाच्या चांदीच्या उत्सवमुर्ती विराजमान करुन साज़ शृंगारकरतात. त्यामुळे यात्रा उत्सवात देवाचे शृंगार दर्शन घडते.

No comments:

Post a Comment