महिला घर सांभाळून व्यवसाय क्षेत्रातही आघाडीवर : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

महिला घर सांभाळून व्यवसाय क्षेत्रातही आघाडीवर : आ. जगताप

 महिला घर सांभाळून व्यवसाय क्षेत्रातही आघाडीवर : आ. जगताप

पुण्यश्लोक डेअरी फार्मला आ. जगतापांची भेट


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महिलांनी आपले कुटुंब सांभाळून व्यवसायाकडे वळाल्यास निश्चित यश मिळते. पुण्यश्लोक डेअरी फार्मच्या संचालिका ज्योती भिटे यांनी गायीचे व म्हशीचे सकस दुध व दुधापासून तयार केलेले पदार्थांची विक्री करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. भिस्तबाग चौक येथील पुण्यश्लोक डेअरी फार्मला आ. संग्राम जगताप यांनी भेट देऊन ज्योती भिटे यांनी आपल्या व्यवसायात मिळविलेल्या कामाचे कौतूक केले.  यावेळी सोमनाथ भिटे, अथर्व भिटे, प्राजक्ता भिटे आदी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, ज्योती भिटे यांना पूर्वीपासून शेती व्यवसायाची आवड असल्यामुळेच त्या दुध व्यवसायाकडे वळाल्या आहेत व त्यात त्यांनी चांगलेच नाव लौकिकास आणले आहे. महिला ही आज पुरुषांबरोबर विविध क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविताना दिसत आहे.


No comments:

Post a Comment