घारगाव येथे वाजली जिल्हा बँकेची तुतारी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

घारगाव येथे वाजली जिल्हा बँकेची तुतारी

 घारगाव येथे वाजली जिल्हा बँकेची तुतारी

माजी आमदार राहुल जगताप व राजेंद्र नागवडे गटाने प्रेमराज भोयटे यांना दत्तात्रय पानसरे यांच्या विरोधात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरविले होते मात्र आ. बबनराव पाचपुते यांच्या मदतीने पानसरे यानी जिल्हा बॅकेत एंट्री केल्याने सहकारात गटबाजी पेटली होती.


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः जिल्हा बॅकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या उपस्थितीत व जिल्हा परिषदेचे सदस्य सदाशिवराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि.29 रोजी झाला. यावेळी जिल्हा सहकारी बँक व नागवडे साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नेते एकत्र आल्याने उपस्थितीच्या भुवया उंचावल्या.
     जिल्हा बॅक निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप व दत्तात्रय पानसरे यांच्यात लढत जवळपास निश्चित मानली जाते. जिल्हा बॅक निवडणूकमध्ये माजी आ.राहुल जगताप हे उतरणार उतरणार असल्याचे लक्षात येताच जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे व बाळासाहेब नाहाटा यांनी नागवडे गटाशी जवळीक करुन राहुल जगताप यांना चेकमेट देण्यासाठी डावपेच सुरू केले असल्याचे चित्र पानसरे यांच्या घारगाव येथे झालेल्या अभिष्टचिंतन सोहळा दिसून आले.
     या वेळी नागवडे साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगीतले की जिल्हा बँकेत पानसरे यांनी शेतकर्‍यांची उसातून कर्ज कपात करु नये या घेतलेल्या भूमिकमुळे तालुक्यात 38 हजार शेतकर्‍यांचा फायदा होऊन 264 कोटींची कर्जमाफी मिळाली. तर जिल्हा परिषद सदस्य यांनी सांगितले की दत्तात्रय पानसरे हा रांगडा गडी असुन त्यांनी जिल्हा बॅकेची कार्यपद्धतीच बदलून टाकली आहे पूर्वी जिल्हा बँक ही कारखानदारांची होती मात्र पानसरे यानी ही व्याख्या बदलवत बँक ही सर्वसामान्य शेतकर्‍यांची असल्याचे दाखवून दिले. यावेळी भगवानराव पाचपुते, हरिदास शिर्के, बाळासाहेब महाडिक, राजेंद्र म्हस्के, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर घारगाव येथे झालेल्या कार्यक्रमास नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, राजेंद्र म्हस्के, स्मितल वाबळे, बाळासाहेब महाडीक, टिळक भोस, प्रशांत दरेकर, बापू गोरे, अशोक खेंडके, दिनेश इथापे, दत्तात्रय गावडे, अशोक ईश्वरे, नारायण जगताप, लतिका जगताप, उपस्थित होते.

No comments:

Post a Comment