पत्रकार रायकर यांच्या मातोश्रीला वीरमाता पुरस्काराने केले जाणार सन्मानित - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

पत्रकार रायकर यांच्या मातोश्रीला वीरमाता पुरस्काराने केले जाणार सन्मानित

 पत्रकार रायकर यांच्या मातोश्रीला वीरमाता पुरस्काराने केले जाणार सन्मानित

नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत येथील प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठाणच्या वतीने दि 1 जाने रोजी माजीमंत्री प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार कै. पांडुरंग रायकर यांच्या मातोश्री जीजाबाई रायकर याना वीरमाता पुरस्कार देऊन त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी 51 हजार रु शैक्षणिक मदत दिली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष सचिन पोटरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय गीताजयंती निमित्त जेष्ठ नागरिक व पत्रकार यांना  श्रीमद भागवत गीताग्रंथाचे वाटप केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी संस्थान चे प्रमुख ह. भ. प. दयानंद महाराज कर्जतकर हे असतील तर माजीमंत्री प्रा राम शिंदे व खा. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, प्रथम महिला नगराध्यक्षा सौ प्रतिभाताई भैलूमे, डॉ सुनील गावडे, अशोकराव खेडकर, प्रसाद ढोकरिकर, वैभव शहा यांचे सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी युनियन बँक व फिनो बँके च्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन होणार आहे. तरी नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
     प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठाणच्या वतीने गेली अनेक वर्षापासून शहिद जवानांच्या मातांना वीरमाता पुरस्कार दिला जातो, सचिन पोटरे यांच्या अध्यक्षते खाली या संस्थेने अनेक लोकोपयोगी उपक्रम घेतले असून रक्तदान शिबीरे, सांस्कृतिक कार्यक्रम, मदत निधी अशा माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

No comments:

Post a Comment