या रस्त्यावरील खड्डे वरती अनं रस्ता खाली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

या रस्त्यावरील खड्डे वरती अनं रस्ता खाली

या रस्त्यावरील खड्डे वरती अनं रस्ता खाली

अहमदनगर-शेवगाव प्रवासासाठी लागतो अधिक वेळ
टॅक्सी चालवताना खड्डे हुलकावणीच्या नादात समोरुन येणारयांत तसेच मागुन पुढे जाणारयांत कायमच वादावादी होते.नगर ते शेवगाव टप्पा गाठण्यासाठी अधीक वेळ जातो.काही ठिकाणी रस्त्यालगत अतिक्रमणामुळे दिसून न येता रस्ता ओलांडणारयांकडुन अचानक अडथळे येत असल्याने अनेक जीवघेण्या प्रसंगास सामोरे जावे लागते आहे.संबधीत शासकीय विभागाकडून उत्कृष्ठ दर्जेने खड्डयाबाबची कामं होऊन रस्त्यालगतची अतिक्रमणे हटवण्याची गरज आहे.                                                                            
अमीत आढगळे, पेपर टॅक्सी ड्रायव्हर,,

नगरी दवंडी/प्रतिनिधी
माका  ः शेवगाव-पांढरीपुल रस्त्यावरील खड्डे बुजवताना शासकीय सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगाव शाखाधीकारी तसेच ठेकेदार यांच्या धोरणानुसार या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम कधीमधी चालू  असते,असे चर्चिले जाते परंतु पुढे पाठ अनं मागे सपाट असेही कामे  होत असल्याची चर्चा सुद्धा कायमच याबाबतीत चालू असल्याचे समजते,यामुळे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत दयनीय झाली असता,खड्डे वरती अन रस्ता खाली असला प्रकार झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.                                                                  याबाबत  असे की,प्रवास करताना पांढरीपुल ते शेवगाव अंतर जवळपास 40कि.मी.चे असल्याने मोठा टप्पा पार करावा लागतो.रस्ता जिल्हा ते तालुक्यास जोडणारा असल्याने दळणवळण भरपूर प्रमाणात असते.प्रवास करताना अधीक वेळही लागता, खड्डे हुलकावणीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे.अपघातही जास्तच प्रमाणात होताना आढळून येतात.याअगोदर रस्तादुरुस्ती बाबतीच्या कामात चालूबंद,धरसोड प्रकार सातत्याने दिसून येत असतो,तर मग खड्डे बुजवताना काय कमी पडतं की लगेचच पुन्हा खड्डे उघडकीस पडतात, वरिष्ठांच्या दुर्लक्षिततेने की अथवा कुणाच्या वरद हस्ते ही कामे होत आहेत की काय असेही सवाल सध्यातरी उपस्थित होत आहेत.                                                      
      याबाबत संबंधित शासकीय विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजवताना उत्कृष्ठ दर्जेच्या कामासह, दुतर्फा असलेली अतिक्रमणे भेदभाव न करता काढल्यास अपघाताचे प्रमाण कमी होऊन जा_ये करणारयां प्रवासी वर्गास,रस्त्यानजीकच्या गावातील ग्रामस्थांना तसेच संबधित इतर घटकास अडचणी येणार नाही.संबंधित विभागीय खात्याने याअगोदर याच रस्त्यावरील काही ठिकाणी धरसोड करत अतिक्रमणे काढली आहेत,तसेच शासकीय विभाग हद्दीतील सुरुवातीपासून ते शेवटी टोकापर्यंतची,सर्व ठिकाणच्या गावच्या रस्त्यालगतची अतिक्रमणे भेदभाव न करता काढावी,जेणेकरून रस्त्यास मोकळा श्वास घेता येईल.     

No comments:

Post a Comment