पीपल्स हेल्पलाईनच्यावतीने शेतकरी संरक्षण कायदा केंद्र सरकारने मंजूर करून अमलात आणण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

पीपल्स हेल्पलाईनच्यावतीने शेतकरी संरक्षण कायदा केंद्र सरकारने मंजूर करून अमलात आणण्याची मागणी

 पीपल्स हेल्पलाईनच्यावतीने शेतकरी संरक्षण कायदा केंद्र सरकारने मंजूर करून अमलात आणण्याची मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः देशातील शेतकर्यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळण्यासाठी शेतकरी संरक्षण कायदा केंद्र सरकारने मंजूर करून अमलात आणावा या प्रमुख मागणीसाठी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाईन यांच्या पुढाकाराने शेतकरी आसूडसभेची स्थापना करण्याचा प्रस्ताव हुतात्मा स्मारकात मांडण्यात आला. तर नगर-पुणे खाजगी लोकल रेल्वे सुरु करण्याचा आग्रह धरुन शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर विश्वमानव मंदिर म्हणून गॅझेट प्रसिध्द करण्यात आले. तसेच पंचायतराज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्यबोधी सुर्यनामा करुन मतदारांची जागृती करण्यात आली.
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी व सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, प्रदिप झरेकर, सुनंदा टिपरे, शिवाजी वाघमारे, संतोष लोंढे, सुशिला देशमुख, अंबिका जाधव, लतिका पाडळे, फरिदा शेख, शारदा भालेकर, उषा निमसे, किशोर मुळे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
     भारत हा खेड्यांचा देश आहे. खेडे विकसीत होण्यासाठी शेतकर्यांचा विकास हा महत्त्वाचा आहे. शेतकरींच्या आत्महत्या वाढत असताना त्यांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळणे अपेक्षित आहे. यासाठी शेतकरी संरक्षण कायदा सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच शेतकर्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकर्यांचा आसूड या विचारांवर आधारित शेतकरी आसूड सभेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. साईबाबांनी सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन मानवतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण ही सर्व धर्मांचा गाभा आहे. या देशाचे अखंडत्व व धार्मिक ऐक्य जपण्यासाठी त्यांचे विचार व शिकवण दिशादर्शक असल्याने शिर्डी येथील त्यांचे मंदिर विश्वमानव मंदिर असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. तर पंचायतराजच्या निवडणुकीत चांगले उमेदवार मताचे पैसे न घेता निवडून दिल्यास गावाचा विकास साधला जाणार असल्याचे स्पष्ट करुन चारित्र्यसंपन्न उमेदवारांना निवडून भ्रष्ट उमेदवारांना पाडण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मतंकोंबाड मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.
     माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी म्हणाले की, नगर-पुणे खाजगी लोकल रेल्वे सुरू झाल्यास नगर शहराचा झपाट्याने विकास होणार आहे. येथील उद्योगधंद्यांना चालना मिळून पुण्यात देखील नगरच्या युवकांना रोजगार सहज प्राप्त होणार आहे. ही दोन शहरे लोकल रेल्वेनी जोडण्यासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. नवीन वर्षाची भेट म्हणून नगरकरांना देण्यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तर केंद्र सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगितले. अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी शिर्डी येथे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. दक्षिण भारतातून येणार्या भाविकांची सोय होण्यासाठी व नगरच्या विकासाला चालना मिळण्यासाठी ही लोकल रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment