जनकल्याण रक्तपेढीच्या सामाजिक कार्यात रोटरी प्रियदर्शनी क्लबचा खारीचा वाटा : गिल्डा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 23, 2020

जनकल्याण रक्तपेढीच्या सामाजिक कार्यात रोटरी प्रियदर्शनी क्लबचा खारीचा वाटा : गिल्डा

 जनकल्याण रक्तपेढीच्या सामाजिक कार्यात रोटरी प्रियदर्शनी क्लबचा खारीचा वाटा : गिल्डा


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः नावाप्रमाणे जनकल्याणासाठी कार्य करणार्‍या जनकल्याण रक्तपेढीच्या सामाजिक कार्यात रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने खारीचा वाटा उचलत मदत करत आहे. जीवनदान देणार्‍या या सेवा कार्यात सर्व नागरिकांनी रक्तदान करून सामील व्हावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी केले.
     सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने जनकल्याण रक्तपेढीला अत्याधुनिक इन्यूबेटर कम ओव्हन मशीन देण्यात आले. अहमदनगर प्रियदर्शनी क्लबच्या अध्यक्षा गीता गिल्डा यांनी रक्तपेढीचे कार्यवाह डॉ.उत्तम शिंदे यांच्या कडे हे ओव्हन मशीन सुपूर्द केले. यावेळी उपप्रांतपाल अ‍ॅड. अभय राजे, सचिव देविका रेळे, खजिनदार शशी झंवर, रक्तपेढीचे व्यवस्थापक मुकेश साठ्ठे, प्रकाश स्मार्ट आदी उपस्थित होते.रक्तपेढीचे कार्यवाह डॉ.उत्तम शिंदे यांनी यावेळी रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी क्लबने जनकल्याण रक्तपेढीला केलेल्या मदती बद्दल सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment