ग्रामपंचायत निवडणुकीत 190 निवडणूक चिन्हांचा उमेदवारांना पर्याय - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, December 30, 2020

ग्रामपंचायत निवडणुकीत 190 निवडणूक चिन्हांचा उमेदवारांना पर्याय

 ग्रामपंचायत निवडणुकीत 190 निवडणूक चिन्हांचा उमेदवारांना पर्याय

यंदा प्रथमच डिजिटल चिन्हाचा समावेश
  यावेळी  ग्रामपंचायत निवडणुकीत चिन्हांची संख्या वाढुन ती 190 करण्यात आली आहे . यामुळे उमेदवारांसमोर नविन चिन्हांचा पर्याय आहे .आपते आवडते चिन्ह निवडता यावे व ठरावीक चिन्हांसाठी वाद होऊ नये हा या मागचा हेतु आहे .
- उमेश पाटील (निवडणुक निर्णय अधिकारी, नगर तालुका)

अहमदनगर  : - निवडणुकीत उमेदवार ठरावीक चिन्हांचीच मागणी करतात . यामुळे निवडणुक आयोगाने प्रथमच ग्रामपंचायत निवडणुकीत असणार्‍या 40 चिन्हांत वाढ करून ती 190 केले आहेत . यामध्ये प्रथमच  डिजीटल चिन्ह ,इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे , दैनंदिन वापराच्या वस्तु , स्वयंपाकघरातील वस्तु ,भाजी , फळे अशा विविध चिन्हांचा समावेश यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत करण्यात आला आहे .यावेळी  जवळपास 150 चिन्हांची यंदा वाढ करण्यात आली असुन उमेदवारांना आपल्या मनपसंद चिन्हांची निवड करता यावी यासाठी त्यांची यादी निवडणुक कार्यालयाच्या दर्शनी भागात लावली आहे .यात ए .सी. , सीसी टिव्ही कॅमेरा , माऊस, संगणक , लॅपटॉप , हेडफोन , लाइटर , डिश अँटेंना ,गणकयंत्र , फोन चार्जर , टि व्ही रिमोट , पेन ड्राईव , इंजेक्शन स्वीच बोर्ड अशा डिजीटल  साधनांबरोबरच हेल्मेट ,नेलकटर , मिक्सर , माइक , दुर्बिण , कढई , ब्रेड टोस्टर , उशी फ्रीज , स्टॅपलर, सेफ्टी पीन  अशा घरगुती व स्वयंपाक घरातील वापराच्या वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे .याबरोबरच ढोबळी मिरची , फुल कोबी , आले , हिरवी मिरची , भेंडी , मका , वाटाणे या भाज्यांसोबत अननस , कलिंगड , द्राक्षे , पेरू , नारळ अशा फळांचा  चिन्हात समावेश करण्यात आला आहे .

No comments:

Post a Comment