डॉ. आरोळे हॉस्पिटलमधील डॉक्टर व सर्व स्टाफला पोषाख देऊन व्यक्त केली कृतज्ञता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 5, 2020

डॉ. आरोळे हॉस्पिटलमधील डॉक्टर व सर्व स्टाफला पोषाख देऊन व्यक्त केली कृतज्ञता

 डॉ. आरोळे हॉस्पिटलमधील डॉक्टर व सर्व स्टाफला पोषाख देऊन व्यक्त केली कृतज्ञता


नगरी दवंडी/प्रतिनिधी

जामखेड ः यावेळी गेल्या 10 महिन्यापासून  डॉ आरोळे कोविड सेंटरमधून 2160 रुग्ण करोना मुक्त होऊन बाहेर पडले आहेत.
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष तालुकाध्यक्ष मंगेश आजबे यांना 5 दिवसांपूर्वी करोना ची लागण झाली होती तेथील डॉ रवी आरोळे, डॉ शोभा आरोळे यांनी आजबे  आजबे यांच्यावर उपचार करून करोना मुक्त करून ठणठणीत बरे केले. त्या अनुषंगाने आपण समाज्याचे देणे लागतो  या भावनेतून त्यांच्या मातोश्री  कोंताबाई आजबे यांनी हॉस्पिटल-मधील डॉक्टर,कर्मचारी यांना उभा पोशाख देऊन केलेल्या सेवेतून उतराई होण्याचा प्रयत्न केला.
    यावेळी डॉ रवी आरोळे, शोभा आरोळे, डॉ प्रशांत खंडागळे, सुलताना शेख,शहाबाई कापसे यांच्या सह आजबे यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी दीपाली आजबे, बहीण कल्पना परकाळे, मेहुणे ज्ञानेश्वर परकाळे, मुलगी प्रणिती आजबे, मुलगा चिराग आजबे, स्वाभिमानीचे युवक तालुकाध्यक्ष प्रा. राहुल पवार, माजी युवक तालुकाध्यक्ष अ‍ॅड.ऋषीकेश डुचे,खुरदैठणचे उप सरपंच बाळासाहेब ठाकरे, स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण होळकर, पिंपखेडचे जेष्ठ नेते गहिनाथ सातपुते,अतुल पवार,गणेश परकाळे, किशोर सातपुते, मंगेश मुळे,अविनाश मोरे, विशाल ढोले,गणेश खेत्रे, चंदू कार्ले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment